कॅनडात अंदाधुंद गोळीबारात 2 ठार, संशयिताचं नाव जाहीर

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - 'मी जे पाहत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता'

कॅनडाची राजधानी टोरांटो शहरात झालेल्या गोळीबारात एका तरुणीचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका आठ-नऊ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री टोरोंटोच्या डॅनफोर्थ आणि लोगन अॅव्हेन्यू भागात ही घटना घडली. कमीत कमी दोन कॅफेंना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

जखमींमध्ये एका तरुण मुलीचा समावेश आहे. तिची स्थिती गंभीर आहे. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींना मदतीचं आव्हान केलं आहे. जखमींवर घटनास्थळी उपचार करण्यात आले. मात्र काही जणांना जवळच्या हॉस्पिटलात हलवण्यात आलं.

या हल्ल्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा कॅनडातील टोरंटो शहरातील गोळीबार झाला त्या घटनास्थळाचं दृश्य

कॅनडातल्या माध्यमांनी स्थानिक पोलीस आणि हॉस्पिटलच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार किमान 10 लोकांना गोळ्या लागल्या आहेत.

जखमी लोकांची परिस्थिती अद्याप कशी आहे, हे समजू शकलेलं नाही. गोळीबार नेमका कुणी केला, का केला यासंबंधी माहिती अद्याप उघड झालेली नाही.

कॅनडाच्या मीडियाने प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडिओमध्ये काळी टोपी आणि काळे कपडे घातलेली एक व्यक्ती हातात असलेल्या एका मोठ्या बॅगमधून बंदुक बाहेर काढताना दिसत आहे.

"टोरोंटोमधले लोक खंबीर आणि धाडसी आहेत. या कठीण समयी आम्ही तुमच्याबरोबर उभे आहोत," असं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले.

रविवारची संध्याकाळ साजरी करत असलेल्या निष्पाप लोकांवर झालेला हा हल्ला घृणास्पद आहे, अशा शब्दांत टोरोंटोचे महापौर जॉन टोरी यांनी यांनी निषेध व्यक्त केला आहे.

कॅनडापेक्षा अमेरिकेत अशा प्रकारच्या हल्ल्यांची जास्त नोंद आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये इथेही अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)