रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीत मेक-अपला एवढं महत्त्व का?

या देखण्या मेक-अपचे फोटो दक्षिण बांगलादेशमधल्या निर्वासित रोहिंग्या मुसलमांनाच्या छावणीत काढलेले आहेत. निर्वासितांच्या छावणीतल्या या रोहिंग्या स्त्रियांसाठी मेकअप का महत्त्वाचा आहे?

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

जवळपास सात लाखाहून अधिक रोहिंग्यांनी म्यानमारच्या राखाईन प्रांतातून पळ काढला आहे.

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

त्यांच्या घरादारांवर झालेले हल्ले तसंच त्यांच्या जीवाला असणाऱ्या धोक्यामुळे त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला.

म्यानमारमध्ये 2017च्या सुरुवातीला रोहिंग्यांची संख्या 10 लाख एवढी होती. या देशातल्या अनेक अल्पसंख्याक समुदायांपैकी रोहिंग्या एक आहेत.

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

म्यानमारच्या लष्कराचं म्हणणं आहे की, त्यांचा लढा रोहिंग्या फुटीरतावाद्यांबरोवर आहे. त्यांनी सर्वसामान्यांवर हल्ला केल्याचा इन्कार केला आहे.

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

किलकोयन यांनी कॉक्स बझार इथल्या निर्वासितांच्या छावणीत या मुलींचे फोटो काढले.

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

रोहिंग्या मुलींच्या पारंपारिक मेक-अपला 'थानका' असं म्हणतात.

थानका म्हणजे एका प्रकारची पेस्ट जी मध्य-म्यानमारमध्ये सापडणाऱ्या एका झाडाच्या खोडाच्या सालापासून बनवली जाते.

ही पेस्ट रोहिंग्या मुली आणि महिला आपले गाल रंगवण्यासाठी वापरतात. ही पद्धत शेकडो वर्षं जुनी आहे.

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

ही पेस्ट फक्त सौंदर्यप्रसाधन म्हणून वापरली जाते असं नाही तर तिच्यामुळे प्रखर उन्हापासून त्वचेचा बचावही होतो. ही पेस्ट चेहेऱ्याला थंड ठेवते.

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

या पिवळ्या पेस्टचे फटकारे चेहऱ्यावर ओढले की, त्याच्या उष्णता प्रतिबंधक लेप बनतो. याने किडे-डासही दूर राहातात आणि मुरुमांवरही रामबाण उपाय आहे.

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

हा पारंपारिक मेक-अप निर्वासितांच्या छावण्यांमध्ये विकत मिळतो. या मेक-अपमुळेच खरंतर इथल्या बायकांच्या आयुष्यात स्थिरता आली आहे.

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

खालच्या फोटोत दिसणारी मुलगी आहे तेरा वर्षांची जुहारा बेगम. "हा मेक-अप करणं हा माझा छंद आहे आणि ही आमची परंपराही आहे."

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

"लष्कराने आमच्यावर गोळ्या झाडल्या, आमच्या कत्तली केल्या. सध्या मी डोंगरमाथ्यावर राहाते. इथे खूप कडक ऊन असतं."

बेगम कॉक्स बझारच्या निर्वासितांच्या छावणीत मागच्या सप्टेंबर महिन्यात आली. राखाईन प्रांतातल्या तिच्या गावावर लष्कराने हल्ला केला होता.

बांग्लादेश सीमेवरच्या जामटोली छावणीत पोहचण्यासाठी तिला पाच दिवस सतत चालावं लागलं होतं.

"एकवेळ मी भात न खाता (जेवण न करता) राहीन पण मेक-अपशिवाय मी जगू शकत नाही."

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

खाली दिसतेय ती नऊ वर्षाची जन्नत आरा. ती कुटूपलोंग रेफ्युजी कँपमध्ये राहाते. "मी हा मेक-अप करते कारण याने माझा चेहरा स्वच्छ राहातो. काही किडे माझ्या चेहऱ्याला चावतात. पण हा मेक-अप त्या किड्यांना दूर ठेवतो. यामुळे माझ्या चेहऱ्याचं संरक्षण होतं."

रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters
रोहिंग्या मेक-अप Image copyright Reuters

रोहिंग्या मुली आणि महिलांचे पारंपारिक मेक-अप केलेले फोटो रॉयटर्स वृत्तसंस्थेची फोटोग्राफर क्लोडाघ किलकोयन यांनी टिपले आहेत.

हेही वाचलंत का?