सीरियात आत्मघातकी हल्ला; 38 ठार

प्रातिनिधिक फोटो बाँबस्फोट Image copyright AFP
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक फोटो

सीरियाच्या दक्षिणेला झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 38 जणांचा मृत्यू झाला आहे.

सीरिया सरकारच्या ताब्यात असलेल्या स्वेइदा शहराजवळच्या भागात हा हल्ला करण्यात आला असं सरकार नियंत्रित प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केलं.

'द इस्लामिक स्टेट ग्रुप' अर्थात आयएस संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या हल्ल्यात आणखी 30 जण जखमी झाल्याचं 'द सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स' संस्थेचं म्हणणं आहे.

गेल्या काही महिन्यात सीरियातील सरकारने दक्षिण भागातील शहरांवर ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती.

सरकार नियंत्रित वृत्तसंस्था सानाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, स्वेइदा शहरात आत्मघातकी हल्ला झाला असून, शहराजवळच्या उत्तर पूर्व भागातील गावांना लक्ष्य करण्यात आलं आहे. मात्र त्यांनी मृत तसेच जखमींचा आकडा दिलेला नाही.

स्फोटकं उडवून देणाऱ्या बेल्टसह तीन कट्टरवाद्यांनी स्वेइदा शहराला लक्ष्य केलं असं ऑब्झर्व्हेटरी संस्थेच्या पत्रकात म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)