सीरिया : ISच्या हल्ल्यांत 200पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

सीरिया हल्ला

फोटो स्रोत, AFP

'द इस्लामिक स्टेट ग्रुप'ने सीरियाच्या दक्षिण भागात एकामागून एक केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान 215 लोकांचा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं अधिकारी आणि मानवाधिकार गट सांगत आहेत.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातलं प्रमुख शहर असलेल्या स्वीदा इथे 50पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमवला आहे. हा आकडा 200च्या वर जाण्याची शक्यता अन्य एजन्सी वर्तवत आहेत.

'द इस्लामिक स्टेट ग्रुप' अर्थात आयएस संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या हल्ल्यानंतर शहरातल्या पूर्व भागामध्ये सरकार समर्थक आणि कट्टरवाद्यांदरम्यान गोळीबार झाला.

दरम्यान, विद्रोहींनी कब्जा केलेल्या दक्षिण भागाला पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी सीरिया सरकारने रशियाच्या मदतीने कारवाई सुरू केली आहे. .

गेल्या अनेक महिन्यात सरकारच्या ताब्यात असलेल्या भागात इस्लामिक स्टेटने केलेल्या हल्लांपैकी हा हल्ला सगळ्यांत मोठा असल्याचं इथले पत्रकार सांगतात.

ब्रिटनस्थित सिरीयन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्सचा दावा आहे की, या हल्लामध्ये कमीत कमी 114 लोक मारले गेले आहेत. ज्यामध्ये 40 सर्वसामान्य नागरिकांव्यतिरिक्त सरकार समर्थक सैनिकांचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार या भागात सुरू असलेल्या संघर्षामुळे आत्तापर्यंत किमान 2 लाख 70 हजार लोकं इथून पळून गेली आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)