इंग्लंडची 1000वी टेस्ट मॅच : हजारी मनसबदारीची ही 17 वैशिष्ट्यं

क्रिकेट, स्पोर्ट्स, इंग्लंड Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इंग्लंड क्रिकेट संघाचं माहेरघर असलेलं लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड

जगाला क्रिकेटची देणगी देणारा इंग्लंडचा क्रिकेट संघ नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. भारताविरुद्धची कसोटी ही इंग्लंडची विक्रमी हजारावी कसोटी आहे.

जाणून घेऊया इंग्लंडच्या हजारी मनसबदारीची ही 17 गुणवैशिष्ट्यं.

1. इंग्लंडनं पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1877 साली मेलबर्न इथे खेळला होता. या सामन्यात इंग्लंडला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

2. हजारावी कसोटी खेळणारा इंग्लंड हा पहिलाच संघ आहे.

3. इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्या 903/7 ही आहे. 1938 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना इंग्लंडने ही विक्रमी मजल मारली होती.

4. इंग्लंडची नीचांकी धावसंख्या 45 अशी आहे. 1887 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना इंग्लंडवर ही नामुष्की ओढवली होती.

5. इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावांचा विक्रम अॅलिस्टर कुकच्या (12,145) नावावर आहे. ग्रॅहम गूच (8900) दुसऱ्या स्थानी तर अलेक स्टुअर्ट (8463) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इंग्लंड क्रिकेट संघ

6. इंग्लंडसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम लेन हटन (364) यांच्या नावावर आहे.

7. इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकं अॅलिस्टर कुकच्या (32) नावावर आहेत.

8. इंग्लंडसाठी सर्वोच्च भागीदारी पीटर मे आणि कॉलिन काऊड्रे (411) यांच्या नावावर आहे.

9. इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम जेम्स अँडरसनच्या (540) नावावर आहे. स्टुअर्ट ब्रॉड (417) तर इयन बॉथम (383) विकेट्ससह तिसऱ्या स्थानी आहेत.

10. इंग्लंडसाठी डावात सर्वोत्तम कामगिरी जिम लेकर (10/53) यांच्या नावावर आहे. मॅचमध्ये सर्वोत्तम प्रदर्शनाचा विक्रमही (19/90) जिम लेकर यांच्याच नावावर आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इंग्लंडचा संघ

11. इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम अॅलिस्टर कुकच्या (156) नावावर आहे.

12. इंग्लंडसाठी कसोटीत आतापर्यंत 686 खेळाडू खेळले आहेत.

13. इंग्लंड संघानं आतापर्यंत 61 ठिकाणी कसोटी सामने खेळले आहेत.

14. इंग्लंडची ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 'अॅशेस' नावानं प्रसिद्ध आहे. इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला 'बेसिल डी ओलिव्हरा' यांचं नाव देण्यात आलं आहे.

15. भारताविरुद्धची मालिका भारतात असताना 'अँथनी डीमेलो' नावानं तर इंग्लंडमध्ये असताना 'टायगर पतौडी' यांच्या नावानं आयोजित केली जाते.

16. इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिका 'विस्डेन ट्रॉफी' नावानं ओळखली जाते.

17. इंग्लंड क्रिकेट संघाला प्रत्येक सामन्यात समर्थन करणारी 'बार्मी आर्मी' प्रसिद्ध आहे.

इंग्लंडची हजाराव्या कसोटीपर्यंत वाटचाल

कसोटी क्रमांक वर्ष प्रतिस्पर्धी ठिकाण निकाल
पहिली 1877 ऑस्ट्रेलिया मेलबर्न 45 धावांनी पराभूत
100वी 1908 ऑस्ट्रेलिया सिडनी 49 धावांनी पराभूत
200वी 1930 दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग 28 धावांनी पराभूत
300वी 1948 ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स 409 धावांनी पराभूत
400वी 1963 भारत चेन्नई अनिर्णित
500वी 1974 पाकिस्तान हेडिंग्ले अनिर्णित
600वी 1966 ऑस्ट्रेलिया अॅडलेड एक डाव आणि 9 धावांनी हार
700वी 1972 ऑस्ट्रेलिया नॉटिंगहॅम अनिर्णित
800वी 1977 ऑस्ट्रेलिया मेलबर्न 45 धावांनी पराभूत
900वी 1981 वेस्ट इंडिज ब्रिजटाऊन 298 धावांनी पराभूत
1000वी 2018 भारत बर्मिंगहॅम

इंग्लंडची कामगिरी

कसोटी 999*
विजय 357
पराभव 297
अनिर्णित 345

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)