मलेशियात 2 लेस्बियन महिलांना जाहीर फटके

लेस्बियन सेक्सचा प्रयत्न केला म्हणून दोन मुस्लीम महिलांना फटक्यांची शिक्षा देण्यात सुनावण्यात आली.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

लेस्बियन सेक्सचा प्रयत्न केला म्हणून दोन मुस्लीम महिलांना फटक्यांची शिक्षा देण्यात सुनावण्यात आली.

मलेशियामध्ये समलिंगी सेक्सचा प्रयत्न करताना पकडले गेलेल्या दोन महिलांना काठीने जाहीरपणे फटके लगावण्यात आले. मलेशियाच्या धार्मिक कोर्टात या महिलांना ही शिक्षा देण्यात आली.

या महिलांचं वय 22 आणि 32 आहे. मलेशियातील तेरेंग्गनू राज्यातील शरिया उच्च न्यायालयात या महिलांना प्रत्येकी 6 फटके लगावण्याची शिक्षा देण्यात आली.

या शिक्षेवर मानवी हक्क कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. मलेशियात समलिंगी संबंधावर धार्मिक तसेच सेक्युलर कायद्यांनी बंदी आहे.

या महिलांना ही शिक्षा दिली जात असताना तिथं 100वर लोक उपस्थित होते, अशी बातमी स्थानिक प्रसारमाध्यम 'द स्टार'ने दिली आहे.

या महिला एका कारमध्ये सेक्स करण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी त्यांना पकडण्यात आलं होतं.

मलेशियातील मानवी हक्कांवर काम करणारी संस्था वुमेन एड ऑर्गनायझेशनने रॉयटर्सला दिलेल्या प्रतिक्रियेत ही घटना मानवी हक्कांची पायमल्ली करणारी आणि खेदजनक असल्याचं म्हटलं आहे. दोन प्रौढ व्यक्तींमध्ये सहमतीने होणाऱ्या शारीरिक संबंधाना गुन्हा ठरवलं जाऊ नये असं या संस्थेने म्हटलं आहे.

व्हीडिओ कॅप्शन,

जकार्तामध्ये समलैंगिक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

तेरेंग्गनू इथल्या स्टेट काऊन्सिलचे सदस्य सतिफुल बहरी ममात यांनी या शिक्षेचं समर्थन केलं आहे. ते म्हणाले, ही शिक्षा कुणाचा छळ करण्यासाठी नाही तर समाजाला धडा देण्यासाठी होती.

या दोन महिलांना एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली होती. इस्लामिक एन्फोर्समेंट ऑफिसरने ही कारवाई केली होती.

इस्लामिक कायद्यानुसार या महिलांना 800 डॉलरचा दंड आणि फटक्यांची शिक्षा देण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मलेशियात समलिंगी संबंध ठेवणाऱ्या महिलांना फटके लगावण्याची शिक्षा यापूर्वीही देण्यात आली आहे.

मलेशिया हा देश मध्यममार्गी मुस्लीमबहुल देश आहे. तिथं मुस्लिमांसाठी लग्न, मालमत्ता यांसाठी इस्लामिक कायदे तर इतर धर्मांच्या नागरिकांसाठी दिवाणी कायदे आहेत.

हे वाचलं का?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)