नवऱ्याला आयड्रॉप्स पाजून मारल्याचा बायकोवर आरोप

फोटो स्रोत, YORK COUNTY POLICE
लाना क्लेटन
एका धक्कादायक घटनेत नवऱ्याच्या पिण्याच्या पाण्यात आयड्रॉप टाकून त्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमेरिकेत एका महिलेविरोधात आरोप दाखल करण्यात आला आहे. नवऱ्याची संपती मिळवण्यासाठी हा खून केला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
लाना क्लेटन (52) असं या महिलेचं नाव आहे. पती स्टीफन क्लेटन यांचा मृतदेह काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या घरात मिळाला होता. त्यानंतर काही दिवसांनी लाना यांना अटक करण्यात आली.
स्टीफन यांचा मृत्यू सुरुवातीला अपघात असल्याचं भासवण्यात आलं होतं. पण शवविच्छेदनानंतर त्यांच्या शरीरात Tetrahydrozoline या रासायनाचा अंश मिळाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं त्या दिशेने फिरली.
हे रसायन काही आयड्रॉप्स, नाकामध्ये टाकायच्या औषधांत असतं. हे औषध प्रिस्क्रिशनशिवाय अनेक ठिकाणी मिळतं.
19 आणि 21 जुलैदरम्यान लाना यांनी स्टीफन यांच्या पिण्याच्या पाण्यात हे औषध टाकलं होतं, असा पोलिसांचा दावा आहे. याच कालावधीमध्ये स्टीफन यांचा मृत्यू झाला.
अंत्यसंस्काराआधी उलगडलं सत्य
लानाने गुन्हा मान्य केला आहे, असा पोलिसांचा दावा आहे. नवऱ्याला काहीही कळू न देता मी त्याच्यावर विषप्रयोग केला, असं तिनं कबुल केलं आहे, असं एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं.
शुक्रवारी अटक केल्यानंतर या महिलेला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. स्टीफन यांची आरोग्य सेवा पुरवणारी कंपनी होती.
स्टीफन यांचा घरात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला, असं सुरुवातीला या सांगण्यात आलं होतं.
फोटो स्रोत, Getty Images
"स्टीफन यांच्या मृतदेहाच त्यांचा घरामागील अंगणात दफन करण्यात येणार होतं. पण त्यापूर्वीच पोलसांनी सत्य शोधून काढलं," अशी प्रतिक्रिया स्टीफन यांचे शेजारी आणि मित्र यांनी दिली आहे.
"स्टीफन यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती," असं हेराल्ड या वर्तमानपत्रानं म्हटलं आहे.
2016मध्ये स्टीफन झोपेत असताना त्यांच्या पत्नीनं त्यांच्या डोक्यावर वार केला होता. पोलीस या घटनेचीही चौकशी करत आहेत. पण Charlotte Observerच्या बातमीत ही घटना अपघाताने झाला होता असं म्हटलं आहे. या हल्ल्यानंतर स्टीफन अस्वस्थ होते, असंही यात म्हटलं आहे. "पती मानसिक छळ करतो आणि तो प्रचंड मूडी आहे, पण त्यानं माझा कधी शारीरिक छळ केला नाही," असं लानानं त्यावेळी सांगितलं होतं.
संपत्तीसाठी खून?
US National Library of Medicineनुसार Tetrahydrozoline मुळे फेफरे येऊ शकतात तसंच श्वाच्छोसवासात अडथळा निर्माण होऊ शकतो. अगदी कमी प्रमाणातील हे रसायनही शरीराला घातक ठरू शकतं.
हे जोडपं 8 वर्षं एकमेकांसोबत राहत होतं, अशी माहिती WSOC-TVनं दिली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
प्रातिनिधिक फोटो
"स्टीफन यांच्या मृत्यूचं कारण ऐकून आम्हाला धक्का बसला आहे," अशी प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
"त्यांचं त्याच्या बायकोवर नितांत प्रेम होतं," असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.
York County Probate Court दिलेल्या बातमीनुसार स्टीफन यांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व संपत्ती पत्नीच्या नावावर होणार होती.
लाना US Department of Veterans Affairsमध्ये काम करत होत्या असं त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून दिसून येतं.
स्टीफन यांचं घर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या घरासारखं असून त्यांची किंमत 800,000 डॉलर इतकी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)