उत्तर कोरियाच्या लष्करी संचलनातून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बाद

उत्तर कोरिया Image copyright AFP

उत्तर कोरियाच्या 70व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं झालेल्या लष्करी संचलनात आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश नव्हता, अशा बातम्या येत आहेत.

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांनी या सोहळ्यात भाषण केले का, याविषयी काहीच स्पष्टता नाही.

उत्तर कोरियानं अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाची हमी दिलेली असल्यानं संचलनात दाखल होणाऱ्या शस्त्रांकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर उत्तर कोरिया शस्त्र प्रदर्शनात कपात केली जाईल अशी आशा काही तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.

Image copyright AFP

या संचलनात उत्तर कोरियानं अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता असलेल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश केला असता तर तो अमेरिकेला आव्हान देण्याचा प्रयत्न मानला गेला असता.

Image copyright AFP/GETTY

AFP या वृत्तसंस्थेनं या संचलनाचे कोणतेही फोटो प्रकाशित केलेले नाहीत. परंतु त्यांचा एक प्रतिनिधी या संचलनाला उपस्थित होता.

Image copyright AFP/GETTY

NK न्यूजकडे सरकारी वाहिनीकडून मिळालेले काही फोटो आहेत, त्यांनीच बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

संचलनात AN2 या विमानांनी 70व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं 70 आकड्याची प्रतिकृती सादर केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)