...तर ब्रेक्झिटवर तर पुन्हा मतदान घ्या - लंडनचे महापौर कडाडले

ब्रेक्झिट आंदोलक Image copyright Getty Images

लंडनचे महापौर सादीक खान यांनी ब्रेक्झिटवर पुन्हा सार्वमत घ्यावे अशी मागणी केली आहे. ब्रेक्झिट संदर्भात युरोपियन युनियनशी ब्रिटिश सरकार करत असलेल्या वाटाघाटींवर त्यांनी टीका केली आहे.

ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे की नको यासाठी 23 जून 2016ला ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आले. यामध्ये ब्रेक्झिट म्हणजेच ब्रिटनच्या बहुसंख्य नागरिकांनी युरोपियन युनियनच्या बाजूने कौल दिला होता. सध्या ब्रिटन ब्रेक्झिट संदर्भात युरोपियन युनियनसोबत वाटाघाटी करत आहे. येत्या सहा महिन्यांत ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार आहे.

खान म्हणाले, "एक तर ब्रिटनला काही मिळणार नाही किंवा चांगलं मिळणार नाही. सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या ब्रिटनच्या भल्यासाठी कमी आणि बोरिस जॉन्सन यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षासाठी जास्त आहेत."

पण ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी यावर पुन्हा सार्वमत घेणं म्हणजे ब्रिटनच्य लोकशाहीचा विश्वासघात असेल, असं मत पूर्वीच व्यक्त केलं आहे.

खान यांनी युरोपियन युनियनमध्ये राहाण्याच्या बाजूने प्रचार केला होता. ते म्हणाले, "ब्रिटिश नागरिकांची इच्छा युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची आहे, हे मी स्वीकारले आहे. पण वाटाघाटींबद्दल असलेला गोंधळाचा दृष्टिकोन आणि खोळंबा लक्षात घेता मला अस्वस्थ वाटत आहे."

ब्रिटनला सरकारला युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठीच्या वाटाघाटी मार्च 2019पर्यंत पूर्ण करायच्या आहेत. खान म्हणाले, देशासमोर दोन धोकादायक पर्याय आहेत पण दोन्ही पर्याय सार्वमत घेताना जी वचनं दिली होती, त्यापासून कोसो दूर आहेत. लोकांनी जी खोटी आश्वासनं आणि असत्य विकण्यात आलं तेच फक्त उघडं पडत आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ब्रिटनचे माहापौर सादिक खान यांनी ब्रेक्झिटवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे.

ब्रिटनची अर्थव्यवस्था आणि लोकांचं आयुष्याशी असा जुगार खेळण्यासाठी थेरेसा मे यांना सत्ता देण्यात आलेली नाही.

यापूर्वी जूनमध्ये खान म्हणाले होते जर ब्रिटनच्या संसदेने सरकारच्या ब्रेक्झिट वाटाघाटींच्या विरोधात मतदान केले तर जनमत विचारात घेतले जावे. आता त्यांनी म्हटलं आहे की लोकांचा अंतिम विचार घेतला पाहिजे.

याचा अर्थ असा की, "ब्रेक्झिटच्या वाटाघाटीसंदर्भात जे काही मतदान घेतलं जाईल त्यात युरोपियन युनियनमध्ये राहाण्याचा पर्यायही असला पाहिजे."

थेरेसा मे यांनी सरकार पुन्हा मतदान घेण्यासाठी सरकार कोणतंही पाठबळ देणार नाही, असं पूर्वीच जाहीर केलं आहे.

खान म्हणाले, "ज्यांना आपल्या पक्षातच वाटाघाटी करता आल्या नाहीत ते युरोपियन युनियनशी वाटाघाटी कशा करतील?"

बोरिस जॉन्सन यांनी दिलेल्या परराष्ट्र मंत्री पदाच्या राजीनाम्याचा संदर्भ देत ते म्हणाले सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या देशच्या हितापेक्षा जॉन्सन यांना पंतप्रधान बनण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या भोवती फिरत आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे : ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जमावं की नाही यावरुन मनसेमध्येच गोंधळ?

हाँगकाँग निदर्शनं : ट्विटर आणि फेसबुकने काढून टाकले चिनी अकाऊंट्स

चांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार

नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चांगली चर्चा - ट्रंप

सामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा आणि सुटका

पूरग्रस्त भागात हे 7 घरगुती उपाय ठेवतील रोगांपासून दूर

‘उमराव जान’ला संगीत देण्यापूर्वी खय्याम खूप घाबरले होते कारण...

हिमनदी समुद्रात कोसळताना तुम्ही कधी पाहिली आहे?

कोल्हापूरकरांना भीक नको, संभाजीराजेंची विनोद तावडेंवर टीका