इटलीतील जगप्रसिद्ध व्हेनिस शहर जलमय : वादळाच्या तडाख्यात 11 ठार

इटली पूर Image copyright Getty Images

वादळी वारे आणि पावसाच्या तडाख्यामुळे इटलीच्या वायव्य भागात आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर खबरदारी म्हणून शाळा, कॉलेज आणि पर्यटन स्थळे बंद ठेवण्या आली आहेत.

सुमारे 180 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे किनारपट्टीवरच्या टेराचिना शहरात एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी झाले आहेत.

अंतर्गत जलमार्गासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हेनिस शहरात पुरामुळे जनजीवन विस्कळित झालं आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराचा 75 टक्के भाग जलमय झाला आहे.

पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलंडल्यांनतर व्हेनिस शहरातलं मुख्य मार्केट सोमवारपासून बंद करण्यात आलं आहे.

इटली Image copyright Stefano Mazzola/Awakening

काही लोक उंच लाकडी पादचारी मार्गांचा वापर करत आहेत.

मार्केटमधील दुकानदार पुराचं पाणी दुकानात घुसू नये म्हणून प्रयत्न करत आहेत.

व्हेनिस शहराच्या उत्तरेकडे जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत.

अशा घटनांत व्हिनिटो इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या एका कर्मचाऱ्याचा बळी गेला.

इटली पूर Image copyright Getty Images

भूस्खलनामुळे घर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर ट्रेंटो सरोवरात स्वत:ची बोट शोधायला गेलेल्या मासेमाराचा मृतदेह सापडला आहे.

या आपत्तीत सोमवारी 6 तर मंगळवारी 5 लोकांचा बळी गेल्याची माहिती सरकारने दिली आहे.

इटली पूर Image copyright EPA

इटलीच्या पश्चिम किनाऱ्याला वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. रॅपालो बंदराजवळची भिंत कोसळल्याने तिथं 19 लोक अडकले होते. त्यांना वाचवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

इटली पूर Image copyright EPA

इटलीची राजधानी रोमध्येही झाडे उन्मळून पडली आहेत. बऱ्याच भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)