मेक्सिकोत 'पितृ पंधरवडा', निघाली 'आत्म्यां'ची मिरवणूक

मृत आत्म्यांची वरात

फोटो स्रोत, AFP

मेक्सिकोमध्ये गेल्या आठवड्यात 'डिया डे मुएर्टोस' हा उत्सव झाला. इथल्या स्थानिक भाषेत सांगायचं झालं तर याला 'मृत आत्म्यांचा दिवस' म्हटलं जातं. मृतांच्या स्मरणासाठी शहरातून एक मिरवणूक काढली जाते.

मेक्सिकोच्या राजधानीत यावर्षी तिसऱ्यांदा हा उत्सव झाला. 2016मध्ये या सणाची सुरुवात झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

आयोजकांच्या मते काही वर्षानंतर ही मिरवणूक पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण होऊ शकतं. यावेळी स्थलांतर ही थीम घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली.

फोटो स्रोत, AFP

स्थलांतरांत ज्यांनी जीव गमावला, त्यांना ही मिरवणूक समर्पित करण्यात आली होती.

फोटो स्रोत, AFP

या मिरवणुकीत सहभागी झालेल्या काहींनी अमेरिका आणि मेक्सिकोमधल्या भिंतीचे तुकडे हाती घेतले होते. त्या तुकड्यांवर स्पॅनिश भाषेत "भिंतीच्या या बाजूच्या लोकांचीही काही स्वप्नं आहेत," असं लिहिलं होतं.

पुर्वजांचे आत्मे येऊ दे

गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला ही मिरवणूक काढण्यात आली होती. यात मेक्सिकन लोक त्यांच्या पूर्वजांचा सन्मान करतात. पूर्वजांचे आत्मे एक दिवस पृथ्वीवर परत येतील असं ते मानतात.

फोटो स्रोत, AFP

फोटो स्रोत, AFP

हा सण मेक्सिकोच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही लोक मेणबत्ती लावून त्यांच्या पूर्वजांचं स्मरण करतात. काही लोक दफनभूमीत जाऊन लहान कार्यक्रम आयोजित करतात. तर काही लोक घरीच पूजेचं आयोजन करतात.

पण चेहऱ्यावर मुखवटे परिधान करणे, भडक कपडे, शरीरावर विचित्र पेटिंग काढणे हेही या सणाचा भाग ठरत आहेत.

फोटो स्रोत, AFP

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, Getty Images

आयोजकांना असं वाटतं की हा सण हॅलोविनची जागा घेऊ शकेल. शनिवारी मेक्सिकोमध्ये पाऊस पडूनही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या मिरवणुकीत 1200 लोक सहभागी झाली होते, असं काही माध्यमांनी बातमीत म्हटलं आहे. मेक्सिकोतील गुआडलाराजा शहरातही ही मिरवणूक झाली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)