Freedom trashcan: हाय हील्स

High heels image

हाय हील्स घालणं, हे स्नायूंसाठी आणि एकूणच आरोग्याला नुकसानदायी असतं, असं अनेक अभ्यासांमध्ये स्पष्ट झालं आहे. हील्समुळे होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून कुशन सोलचं पर्यायी मार्केट उभं राहिलं, जेणेकरून शारीरिक त्रास कमी होऊ शकेल.

हाय हील्स न घालणं, हे अधिक सोपं ठरलं असतं का?

हाय हील्स आणि महिलांच्या ग्लॅमरचा, आणि पर्यायाने पाटदुखीचा, आता थेट संबंध जोडला जात असला तरी हील्सचा शोध मुळात महिलांसाठी झालाच नव्हता.

पर्शियातल्या घोड्यावर बसलेल्या सैनिकांनी हाय हील्स वापरायला सुरुवात केली. आधुनिक इराणमध्ये अशा पादत्राणांचा वापर केला जातो.

दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा

हाय हील्स परिधान करण्यास नकार दिल्यामुळे दोन वर्षांपूर्वी लंडनमध्ये एका रिसेप्शनिस्टला कामावरून घरी पाठवण्यात आलं. त्यानंतर हाय हील्स परिधान करण्याची सक्ती बेकायदेशीर ठरवली जावी, अशी मागणी आग्रह धरू लागली.

सरकारने ही मागणी तर मान्य केली नाही, मात्र कामाच्या ठिकाणी ड्रेसकोडच्या जाचातून मुक्तता मिळवून देऊन काही दिशानिर्देशकं जाहीर करू, असं ठामपणे सरकारने सांगितलं.

काही वर्षांपूर्वी अभिनेत्री इमा थॉम्पसनने ग्लोडन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात लाबुटीन हील्स काढून ठेवल्या होत्या. या हील्समुळे आपले पाय खूपच दुखत असल्याची इमाने त्यावेळी तक्रार केली होती. नंतर तिने अनवाणी पायानेच पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं होतं.