Freedom trashcan: तवा

Saucepan image

'अन्न हे पूर्ण ब्रह्म' म्हणत आपण सगळेच मस्स्तपैकी खातो-पितो. पण त्याचा अर्थ आपण सगळेच स्वत:चा स्वयंपाक स्वतः करतो, असा नाही.

घरोघरी दररोज जेवण-नाश्ता-चहापाणी या घरगुती कामांची जबाबदारी असते. आणि बहुतांश घरांमध्ये ही जबाबदारी महिलांच्या खांद्यावर येऊन पडते.

संयुक्त राष्ट्र संघटनेनं विकसनशील देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झालंय की पुरुषांच्या तुलनेत महिला दररोज दीड तास जास्त स्वयंपाकासाठी देत आहेत. विकसित देशांमध्ये हे अंतर एक तास एवढंच आहे.

दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा

जगाच्या पाठीवर भारतीय महिला स्वयंपाकघरात सर्वाधिक वेळ व्यतीत करतात, असं हे सर्वेक्षण सांगतं. 2015 मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय महिला दर आठवड्यात 13 तास स्वयंपाकघरात व्यतीत करतात.

पण व्यावसायिक क्षेत्रात नेमकं हेच लिंग गुणोत्तर उलटं होतं. युनायटेड किंगडममध्ये फक्त 17 टक्के शेफ महिला आहेत. याला व्यावसायिक किचनमधलं वातावरण कारणीभूत असल्याचं काहींचं म्हणणं आहे, तर काहींच्या नुसार कामाच्या अनियमित शिफ्ट्स महिलांच्या जीवनशैलीत अडथळा निर्माण करतात.

पुरुष आणि महिला शेफ यांचं प्रसारमाध्यमांद्वारे केलं जाणारं चित्रण, यामुळेही मोठा फरक पडतो, असा एक सामाजिक अभ्यास सांगतो. बौद्धिक तसंच तांत्रिक कामासाठी पुरुषांना जितकं श्रेय मिळतं, तितकं श्रेय महिलांना मात्र तांत्रिक कौशल्याच्या कामांसाठी मिळत नाही, त्यांचं कौतुक होत नाही, असं लेखकाचं म्हणणं आहे.