Freedom trashcan: पोछा किंवा पोतेरे

Mop image

घरगुती कामं ही महिलांचीच जबाबदारी आहेत, असं पारंपरिक समज समाजात रूढ झाली आहे.

समाजात अनेक ठिकाणी ही परंपरा झुगारून देण्याचे प्रयत्नही झाले आहेत. परंतु छान, टापटीप, सुरेख घर असावं ही अपेक्षा काही कमी झाली नाही, आणि त्यासाठी घरच्या करत्या बाईकडूनच अपेक्षा असते, मग ती पूर्णवेळ असो की अर्धवेळ कामावर जाणारी असली तरी.

2016मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार इंग्लंडच्या घरांमध्ये महिला पुरुषांपेक्षा 60 टक्के जास्त अशी कामं करतात, ज्यांचा मोबदला मिळत नाही.

दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा

जगभरात मोबदला मिळणारे आणि न मिळणारे कामं लक्षात घेतले तर कळतं की विकसित देशांमध्ये महिला पुरुषांच्या दररोज अर्धा तास जास्त काम करतात. विकसनशील देशांमध्ये हे प्रमाण 50 मिनिटं एवढं आहे, असं संयुक्त राष्ट्रांचं संशोधन सांगतं.

म्हणजे जर रोज रात्री आठ तासांची झोप मिळते, तर पुरुषांच्या तुलनेत महिलांना 19 दिवस कमी मिळतात, असं स्पष्ट झालं आहे.