Freedom trashcan: ब्रा

Bra image

"केवळ तुमच्या स्तंनावरून तुमचं सौंदर्य ठरत नाही. सुंदर दिसण्याचे अनेक प्रकार असतात." असं म्हणणं आहे ब्रा घालण्याच्या सक्तीविरोधात बंड पुकारणाऱ्या ब्लॉगर शिडेरा एग्गेरी यांचं. त्या यंदाच्या BBC 100 Women या प्रेरणादायी आणि कर्तृत्ववान महिलांच्या यादीत आहेत.

ताररहीत ब्रांच्या विक्रीत वाढ झाल्याचं इंग्लंडमधील विक्रेते सांगतात. याचाच अर्थ महिला आता आपल्या कम्फर्टचा जास्त विचार करू लागल्या आहेत.

ब्रा घालण्याविरुद्ध महिलांनी पहिल्यांदा आवाज उठवला होता, हे त्याच्या जवळपासही जाणारं नाही.

दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा

1968 मध्ये मिस अमेरिका सौंदर्यं स्पर्धेच्या आयोजनाच्या ठिकाणाबाहेर ब्रा विरोधात आंदोलन झालं होतं. तेव्हा या आंदोलनकर्त्यांना 'ब्रा बर्निंग फेमिनिस्ट्स' हे बिरूद चिकटलं.

आणखी काही महिलांनी यानंतरच्या काळात ब्रासह काही इतर वस्तू जाळल्या नाहीत पण त्यांना केराची टोपली दाखवली. या वस्तू म्हणजे महिलांना दबावाखाली ठेवणाऱ्या विचारांचं प्रतीक आहे, असं म्हणत त्यांना बाजूला सारण्यात आलं.

हजारो वर्षांपासून काही न काही रूपात ब्रा अस्तित्वात आहे. 1907च्या सुमारास व्होग मासिकाने 'ब्रेझियर' ही संज्ञा वापरली. पण त्याकाळी सर्व महिलांसाठी एकाच आकाराची ब्रा उपलब्ध असायची. मग ड्रेसमेकर इडा रोसेनथल यांनी विविध कप साइझच्या ब्रा डिझाईन करण्यास सुरुवात केली.