Freedom trashcan: मॅगझीन किंवा मासिक

Magazines image

'द लेडीज मर्क्युरी' हे महिलांसाठी पहिलं मासिक 1693 मध्ये प्रकाशित झालं.

"विवाहित असो, कुमारी असो वा विधवा, महिलांचं प्रेम, लग्न, वर्तन, पोशाख आणि त्यांच्या विनोदांविषयी सगळ्या चांगल्या आणि उत्सुकता निर्माण करणाऱ्या गोष्टींचा उहापोह करणं" या मॅगझीनने स्वतःचं ध्येय ठरवलं होतं.

आजकालची महिला मासिकं प्रामुख्याने फॅशन आणि सेलिब्रेटी गॉसिपवर भर देतात. काही मासिकांमध्ये अन्य विषयांवरचं लिखाण असतं. अशा मासिकांचे संपादक आणि मालक असा युक्तिवादही देऊ शकतात की वाचकांना जे आवडतं, तेच आम्ही त्यांना पुरवतो आहोत.

दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा

मात्र सेलिब्रिटींविषयी अधिकाअधिक जाणून घेण्याच्या सवयीमुळे तरुणांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

इंग्लंडमध्ये 11 ते 16 वयोगटात घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार 58 टक्के मुलंमुलींनी म्हटलं होतं की त्यांच्या सदैव सुंदर दिसण्याच्या अट्टाहासामागे सेलिब्रेटी कल्चरच आहे.