Freedom trashcan: लग्नाची अंगठी

Wedding ring image

पारंपरिक व्यवस्थेनुसार लग्न म्हणजे दोन कुळांमध्ये ऋणानुबंध किंवा दोन राजकीय गटांमध्ये संबंध निर्माण करण्यासाठी केली जाणारी तडजोड होती. पण आधुनिक काळात लग्नाला प्रेमाचं, प्रणयाचं आणि कुठेकुठे तर खंडणीचं प्रतीक म्हणूनही पाहिलं जातं.

इंग्लंडमध्ये एका लग्नासाठी साधारण 39,000 डॉलर्स खर्च येतो, असं एका सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे.

वेडिंग रिंगचं आरेखन हे प्रत्यक्षात प्राचीन इजिप्तमधील विचार संस्कृतीचं प्रतीक आहे. मात्र इंग्लंडमधील जोडपी आता जुन्या तत्त्वांनुसार विवाहबद्ध होण्यास राजी नाहीत.

दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा

2015 मध्ये इंग्लंडमधील लग्नदर विक्रमी घसरला. घटस्फोटाचं वाढतं प्रमाण हे यामागचं कारण असू शकतं.

लग्नाच्या बंधनात अडकू नये, असं वाटणं तसंच लग्नसोहळ्यांचा प्रचंड खर्च ही लग्नदर घटण्यामागची कारणं असू शकतात.

अमेरिकेत घटस्फोटांचं प्रमाण कमी होत चाललं आहे, कारण जोडपी लग्नं उशिरा आणि परिपक्व होऊन करत आहेत.