Freedom trashcan: बाहुल्या

Doll image

बाहुल्या फक्त मुलींसाठीच असतात, हा विचार दूर सारण्यासाठी पश्चिमात्य समाजात वेगवेगळ्या मोहिमा हाती घेण्यात येत आहेत.

गुलाबी म्हणजे मुलींचा रंग, ही मानसिकता दूर व्हावी, असं टीकाकारांना वाटतं. मुलींना लक्षात घेऊन बाहुल्या तयार केल्या जातात.

मुलंमुली ज्या खेळण्यांबरोबर खेळतात त्यानुसार त्यांच्या अपेक्षा तयार होतात. मोठं झाल्यावरही त्यांचे विचार तसेच राहू शकतात.

दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा

घरगुती कामांप्रति एकनिष्ठ राहतील, अशा पद्धतीची खेळणीच मुलींना दिली जातात. सौंदर्य प्रसाधनं भेट म्हणून दिली जातात. त्यामुळे मुली स्वत:ला शास्त्रज्ञ, उद्योजक तसंच जागतिक नेते म्हणून विचारच करू शकत नाहीत.

आता काही कंपन्या जाणीवपूर्वक मुलं तसंच मुलांचा विचार करून बाहुल्यांची निर्मिती करत आहेत. ट्रान्सजेंडर, अपंग अशा पद्धतीच्या बाहुल्या तयार होत आहेत.