Freedom trashcan: बोनस वस्तू

Question mark image

आम्ही जगभरातल्या महिलांना विचारतोय की अशा कोणत्या वस्तू आहेत, ज्या त्यांना मनसोक्त आयुष्य जगण्यापासून रोखतात, अडसर उत्पन्न करतात.

आमच्या या खेळामधल्या या वस्तू आहाला आमच्या वाचकांनीच सुचवल्या होत्या. तुम्ही यापैकी एखादी वस्तू या डिजिटल कचरापेटीत टाकून, तिथल्या बटणवर क्लिक करून या वस्तूविषयी अधिक माहिती मिळवू शकता.

पण आम्हाला वाटतं याव्यतिरिक्त तुमच्याकडेही कुठली एखादी वस्तू असावी. मग तो एखादा धार्मिक पोशाख असू शकतो, बाळांचे लिंगाधारित कपडे आणि पगारांमधली लैंगिक दरी दाखवणाऱ्या पगाराच्या पावत्या, आम्हाला आणखी काही वस्तू सुचवण्यात आल्या होत्या. त्याव्यतिरिक्त या आणखी काही-

एअरब्रश

सोशल मीडिया आणि जाहिरातबाजीत नेहमीच वादग्रस्त ठरलेली एक वस्तू म्हणजे एअरब्रश. हा काही खराखुरा ब्रश नव्हे तर फोटो एडिट करताना वापरला जाणारा एक असा ब्रश आहे, ज्यामुळे लोकांची कांती उजळ करता येते, त्यांना प्रत्यक्षापेक्षा बारिक दाखवता येतं किंवा त्यांच्यातली कुठलीही दर्शनीय त्रुटी मिटवता येते.

मग काही अभिनेते मॅगझीन संपादकांकडे असा आग्रह धरतात की त्यांचे कव्हर फोटोंशी अशी कुठलीही छेडछाड होता कामा नये. यापैकीच एक आहेत यंदाच्या BBC 100 Women पैकी एक असलेल्या अभिनेत्री जमीला जमील. या सेलेब्सना ही चिंता असते की त्यांचे फॅन्स मग आकर्षक शरीर मिळवण्याच्या नादात काहीतरी भलतंच करून बसतात.

पण 2015च्या एका आकडेवारीनुसार अर्ध्यापेक्षा जास्त लोक सोशल मीडियावर फोटो टाकण्यापूर्वी अनेक फिल्टर्सचा वापर करतात. मग आपल्यात आणि त्या मॅगझीनमध्ये काय फरक?

कौटुंबिक कामांची डायरी

कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या गरजांचा ट्रॅक आईने ठेवावा, या उद्देशानं तयार करण्यात आलेली एक डायरीय. यापैकी बहुतांश कामांवर महिलांनाच लक्ष ठेवावं लागतं.

स्त्रीवाद्यांच्या मते याला मेंटल लोड किंवा मानसिक भार म्हटलं जातं आणि त्याविरोधात आवाज उठवण्याचं प्रतीक म्हणजे ही कौटुंबिक कामांची डायरी. प्रत्येक घरगुती कामांची माहिती ठेवणं, काय करायला हवं, काय नाही, याचा सतत विचार करणं, एवढ्या सगळ्या गोष्टी महिलांनीच का लक्षात ठेवाव्या, असा त्यांचा सवाल आहे.

पण या टीकेविरोधातही काही माता बोलत आहेत. त्यांच्यामते एक आई म्हणून करावयाच्या अनेक कामांचं नियोजन करण्यासाठी ही डायरी अत्यंत उपयुक्त ठरते.

स्त्रीवाद किंवा फेमिनिझ्म

काहींचा Freedom Trashcan या संकल्पेनेलाच मुळात विरोध होता तर काहींना स्त्रीवादाची ही एकंदर चळवळ पटत नाही.

लोकांना वाटतं या चळवळीनं आता एक असं घातक रूप घेतलं आहे, ज्यात महिलांवर एकप्रकारचा दबाव आहे की त्यांनी आपल्या लहान मुलांना घरी ठेऊन कामावर जायला हवं, कारण त्यातच त्यांचं स्वातंत्र्य दडलं आहे. नाहीतर त्यांच्यावर अन्याय केला जातोय.

टाय, कफलिंक्स आणि सूट्स

या Freedom Trashcan मध्ये फक्त महिलाच एखादी वस्तू टाकत आहेत, असं नाही. इथं असे अनेक पुरूषसुद्धा आहेत जे काही विशिष्ट पोशाखांचा त्याग करू इच्छितात, कारण त्यांच्यानुसार ती त्यांच्यावरील बंधनं आहेत. "या आमच्यासाठी शारीरिक अडचणी आहेत, अगदी महिलांच्या अंतरवस्त्रांप्रमाणे," एक पुरुष म्हणाला.

दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा