अफगाणिस्तान : लष्कराच्या मशिदीत स्फोट; 12 ठार, 33 जखमी

अफगाणिस्तान Image copyright EPA

अफगाणिस्तातल्या पूर्व खोस्त प्रांतात एका मशिदीमध्ये झालेल्या बाँब स्फोटात 12 लोक ठार झाले आहेत. अफगाणिस्तानचे सैनिक शुक्रवारी नमाज पठणासाठी या मशिदीत आले होते त्यावेळी हा स्फोट झाला. या स्फोटातल्या जखमींची संख्या 33 इतकी आहे.

अफगाणिस्तानाच्या लष्कराचा या प्रांतातल्या मंडझोई जिल्ह्यात तळ आहे. या तळाच्या आतमध्ये ही मशीद आहे.

खोस्त प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते तालीब मंगल यांनी या स्फोटाची माहिती दिली.

रॉयटर्सने मृतांची संख्या 26 असल्याचं म्हटलं आहे.

मृत पावलेले लोक लष्कराशी संबंधित आहेत.

या स्फोटाची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. काबूलमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात 50 लोक ठार झाले होते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)