रशियासोबत तणावानंतर युक्रेनने पुकारला मार्शल लॉ

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ: रशियासह तणावानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ

रशियाने युक्रेनची 3 जहाजं पडकून जहाजावरील 23 कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर युक्रेनच्या काही भागांत मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी मार्शल लॉ लागू करण्याची सूचना केली, त्याला संसदेने मान्यता दिली.

रशियाच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता असलेल्या किनारी भागात 30 दिवसांसाठी हा मार्शल लॉ लागू असेल.

या कायद्यानुसार या भागांत आंदोलन, मोर्चे काढता येणार नाहीत. शिवाय नागरिकांना लष्करी सेवेसाठी बोलवलं जाऊ शकतं.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या निर्णयाबद्दल काळजी व्यक्ती केली आहे.

रशियाने 2014ला ताब्यात घेतलेल्या क्रिमायापासून काही अंतरावर रशियाने समुद्रातील युक्रेनच्या 3 बोटींवर रशियाने गोळीबार केला आणि या बोटी जप्त केल्या. यामध्ये युक्रेनचे खलाशी जखमी झाले आहेत. रशियाची ही कृती म्हणजे आगळिक असल्याची टीका युक्रेनने केली आहे.

रशियाने ही जहाजांनी बेकायदेशीररीत्या समुद्रात प्रवेश केल्याचं म्हटलं आहे. रशियाने युक्रेनच्या या खलाशांची साक्षही टीव्हीवर प्रसारित केली असून त्यामध्ये युक्रेनचे खलाशी त्यांची कृती रशियासाठी प्रक्षोभक असल्याचं मान्य करताना दिसतात.

गेल्या काही वर्षांतील रशिया आणि युक्रेन यांच्यात पहिल्यांदाच खुला संघर्ष होत आहे. तर रशियाचं पाठबळ असलेले फुटीरतावादी आणि रशियाचे स्वयंसेवक 2014पासून युक्रेनच्या फौजांशी पूर्वी युक्रेनमध्ये संघर्ष करत आहेत.

बऱ्याच पाश्चात्य देशांनी रशियाच्या कृतीचा विरोध केला आहे.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाच्या जमिनीवर हल्ल्यांची भीती अतिशय गंभीर असल्याचं म्हटलं आहे.

न्यूयॉर्कमध्ये युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक झाली. या बैठकीत रशिया आणि पाश्चात्य देशातील वाद स्पष्ट झाले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी रशियाची कृती म्हणजे अंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जे घडत आहे ते आवडलेलं नाही असं प्रतिक्रिया दिली आहे.

जर्मनीच्या चॅन्सलर यांच्याशी पुतिन यांनी चर्चा केली.

युक्रेनने जाणीवपूर्वक रशियाच्या संघराज्याच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे, अशी प्रतिक्रिया क्रेमलिनकडून देण्यात आली आहे.

मार्शल लॉ म्हणजे काय?

युक्रेनमधील 276 खासदारांनी मार्शल लॉ पाठिंबा दिला. युक्रेनमधील 27पैकी 10 प्रांतात मार्शल लॉ लागू झाला आहे. मार्शल लॉची अंमलबजावणी 27 डिसेंबरपर्यंत होईल.

31 मार्च 2019ला युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ती टाळण्यासाठी मार्शल लॉ लागू केला आहे, अशी टीका काहींनी केली. हा आरोप त्यांनी नाकारला आहे. रशियासोबत संघर्ष झालाच तर पूर्ण सत्ता हाती हवी, असं त्यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने 60 दिवसांचा मार्शल लॉ लागू करावा अशी मागणी केली आहे.

रविवारी काय घडलं?

सकाळी युक्रेनच्या बर्डियांसक आणि निकोपोल या गनबोटी आणि याना कापा ही टगबोट काळ्या समुद्रातल्या ओडेसा बंदरावरून अझोव समुद्राजवळील मरिपोल या शहराकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या.

रशियाने या नौका रोखण्याचा प्रयत्न केल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे. तसंच टगबोटीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. तरीही त्या कर्च सामुद्रधुनीपर्यंत गेल्या. तिथे त्यांना रशियाच्या युद्धनौकांनी रणगाड्यांनी अडवलं.

Image copyright Getty Images

रशियाने या भागात दोन फायटर जेट्स आणि दोन हेलिकॉप्टर्स तैनात केले होते. या नौका बेकायदेशीरपणे आमच्या सागरी हद्दीत प्रवेश करत आहेत असा आरोप रशियाने केला आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या कारणास्तव तिथली जलवाहतूक थांबवण्यात आली आहे.

युक्रेनच्या नौदलाच्या मते नौका त्या भागातून जात असताना बंद पडल्या. या हल्ल्यात नौकेतील सहा लोक जखमी झाले.

समुद्रावाटे मरिओपोलला जाण्याच्या योजनेबाबत रशियाला माहिती दिल्याचंही युक्रेनचं म्हणणं आहे.

पार्श्वभूमी

अझोव समुद्र क्रिमिअन द्विपकल्पाच्या पूर्वेला आणि युक्रेनच्या दक्षिणेला आहे. युक्रेनच्या दक्षिण भागातले काही प्रदेश रशियाच्या बाजूने असलेल्या फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेतले आहेत.

या समुद्राच्या उत्तर भागात बेरडियांसक आणि मरिओपोल ही युक्रेनची बंदरं आहेत. ही बंदरं प्रामुख्याने धान्य, स्टील, कोळसा यांच्या निर्यातीसाठी वापरली जातात.

2003 मध्ये झालेल्या एका कराराने युक्रेन आणि रशियाने दोन्ही देशांच्या नौकांना या समुद्रातून मुक्त वाहतूक करण्याची मुभा दिली होती.

पण गेल्या काही काळापासून रशियाने युक्रेनच्या या बंदरांतून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. रशियाची एक मच्छिमार नौका ताब्यात घेतल्यानंतर रशियाने हे पाऊल उचललं होतं.

या महिन्याच्या सुरुवातीला या समस्येवर काही ठोस पावलं उचलणार असल्याचं युरोपियन महासंघाने म्हटलं होतं.

फुटीरतावाद्यांनी 2014 पासून युक्रेनविरुद्ध छुपं युद्ध पुकारल्यानंतर पूर्व डोनेस्टस्क आणि लुहान्सक भागात 10,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांनी रशियाने या फुटीरतावाद्यांना शस्त्रं पुरवल्याचा आरोप लावला केला आहे.

मॉस्कोने शस्त्र पुरवल्याच्या आरोप फेटाळले आहेत, मात्र त्याचवेळी रशियातील काही घटक बंडखोरांना मदत करत असल्याचं मान्य केलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)