पुढचे 3 महिने El Niñoचं सावट : तापमान वाढणार

  • मॅट मॅग्रा
  • पर्यावरण प्रतिनिधी
फोटो कॅप्शन,

2015मध्ये El Niño चा प्रभाव तीव्र होता.

येत्या 3 महिन्यांत पॅसिफिक महासागरात El Niño निर्माण होण्याची शक्यता 75 ते 80 टक्के असेल, अशी शक्यता जागतिक हवामान संघटनेनं (The World Meteorological Organization) व्यक्त केली आहे. पण हा El Niño 2015 - 2016 इतका प्रबळ नसेल, असं ही The World Meteorological Organization म्हटलं आहे.

या El Niño मुळे भारतात तापमानात थोडी वाढ होईल, या पलीकडे जास्त परिणाम होण्याची शक्यता नाही, अशी माहिती भारतातील तज्ज्ञांनी दिली आहे.

El Niño ही पॅसिफिक महासागरातील नैसर्गिक घटना आहे. यामुळे पॅसिफिक महासागराच्या तापमानात बदल होतात आणि त्याचा परिणाम जगभरातील हवामानावर होतो. दक्षिण अमेरिकेतील पूर आणि आफ्रिका आणि आशियातील दुष्काळ यांचा संबंध El Niñoची जोडला जातो. यामुळे पॅसिफिक महासागरात उष्णता वाढून तापमानात वाढ होते.

WMOने या संदर्भात आज माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटलं आहे की पूर्व-मध्य पॅसिफिकमध्ये ऑक्टोबरपासून कमकुवत El Niñoची निर्मिती होत आहे. पण समुद्रात तयार झालेल्या या उबदारपणाचा हवामानावर अजून परिणाम झालेला नाही.

शास्त्रज्ञ मे महिन्यापासूनच नव्या El Niñoची शक्यता व्यक्त करत होते.

ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मेटोरोलॉजीने El Niño डिसेंबरपासून सुरू होईल, असं म्हटलं आहे. तर अमेरिकेने जानेवारीमध्ये El Niñoना सुरुवात होईल, याची 90 टक्के शक्यता व्यक्त केली आहे.

फोटो कॅप्शन,

El Niñoचा संबंध दुष्काळाशी आहे.

WMOच्या मॉडेल्सनुसार डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण क्षमेतच्या El Niñoची शक्यता 75-80 टक्के असल्याचं म्हटलं आहे.

WMOनं म्हटलं आहे, "आमच्या अंदाजानुसार उबदार-सामान्य ते मध्यम स्वरूपाचा El Niño असेल. समुद्राच्या पृष्ठभागाचा तापमान 0.8 ते 1.2 डीग्री सेल्सियस इतकं वाढेल."

तीव्र El Niñoची शक्यता मात्र कमी आहे, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

WMOच्या Climate Prediction and Adaptation विभागाचे प्रमुख मॅक्स डेली यांनी म्हटलं आहे, " हा El Niño 2015-2016 इतका तीव्र नाही. 2015-2016मध्ये जगभरात दुष्काळ, पूर आणि क्लोरल ब्लिचिंगच्या घटना घडल्या होत्या."

तरीही यामुळे पाऊस आणि तापमानावर याचा परिणाम होईल. त्याचे परिणाम शेती, अन्नसुरक्षा, पाण्याचं व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य यावर होऊ शकेल. याचा दीर्घकालीन परिणाम हवामान बदलावर होईल आणि 2019मध्ये जागतिक तापमान वाढीत भर पडेल, असं ते म्हणाले.

El Niñoचा परिणाम अन्नाच्या तुटवड्यावर कशा प्रकारे होऊ शकतो यावर UN's Food and Agriculture Organizationने स्वतंत्र अहवाल दिला आहे.

भारतावर परिणाम नाही

हवामान खात्याचे पुणे विभागातील संशोधक डी. एस. पै यांनी यासंदर्भात बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ''याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही. भारतातील तापमानात किंचित वाढ होईल. या पलीकडे फारसा परिणाम होणार नाही. पावसावर काही परिणाम होण्याची शक्यता नाही."

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)