कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ : OPECचा उत्पादन घटवण्याचा निर्णय

पेट्रोल Image copyright Getty Images/AFP

ऑग्रनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग (OPEC) कंट्रिज या 14 प्रमुख तेल उत्पादक राष्ट्रांच्या संघटनेने कच्च्या तेलाचं उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन घटवण्याचा निर्णय या देशांनी घेतल्यानंतर तेलाच्या किमती 5 टक्केंनी वाढल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून या कपातीची अंमलबजावणी होईल, ती 6 महिने सुरू राहील.

ऑक्टोबरपासून कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्केंनी घसरल्याने OPECने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतून कच्च्या तेलाचं उत्पादन वाढण्याचं आणि कच्चा तेलाच्या मागणीत घट होण्याचा अंदाज असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय रशियाच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या तेल उत्पादक देशांनीही तेल उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला आहे.

OPEC दररोज 8 लाख बॅरल इतकं उत्पादन घटवणार आहे. तर रशियाच्या नेतृत्वाखालील देश दररोज 4 लाख बॅरल इतक उत्पादन घटवणार आहेत. या निर्णयातून व्हेनेझुएला, लिबिया आणि इराण या देशांना वगळण्यात आलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या देशांना तेलाच्या किंमती कमी ठेवण्याचं आवाहन केलं होतं.

Image copyright AFP

या निर्णयाचा तेलाच्या किमतीवर दीर्घकालीन परिणाम काय होईल, याचा अंदाज येऊ शकलेला नाही.

कॅपिलट इकॉनॉमिक्स या संस्थेतील अर्थतज्ज्ञ कॅरोलिन बेन म्हणाल्या, "संथ आर्थिक विकासाचा परिणाम कच्च्या तेल्याच्या मागणीवर दिसून येईल. शिवाय अमेरिकेतील वाढलेले उत्पादन लक्षात घेता तेलाच्या किमती नकारात्मक प्रभाव दिसेल, असा अंदाज आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)