जेव्हा ख्रिश्चनांनीच इंग्लंड आणि अमेरिकेत ख्रिसमसवर बंदी घातली होती...

ख्रिश्चन Image copyright UNIVERSAL HISTORY ARCHIVE
प्रतिमा मथळा कट्टर धर्मनिष्ठ ख्रिश्चन नियमांचे पालन करत

एक काळ असा होता की जेव्हा ख्रिश्चन धर्मविरोधी कृत्यांविरोधात पावलं उचलली पाहिजेत, असं इंग्रजांना वाटू लागलं होतं.

प्रत्येक डिसेंबरमध्ये लोक नैतिकदृष्ट्या अनुचित प्रकारामध्ये अडकू लागले होते, त्यामुळे ते थांबविण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं वाटू लागलं होतं. या काळात लोक अत्यंत जोशपूर्ण असायचे आणि त्याच भरात ते ख्रिश्चन जीवनशैलीच्या दृष्टीने अयोग्य वर्तन करायचे.

नशेत आकंठ बुडालेल्या लोकांनी दारूचे गुत्ते भरून जायचे. त्यासाठी दुकानं आणि इतर व्यवहार नेहमीच्या वेळेआधीच बंद व्हायचे. घरं पानाफुलांनी सजवून नाचगाणी चालायची, आणि लोक मित्रपरिवाराबरोबर मेजवान्यांचा आस्वाद घ्यायचे.

हे सगळं ख्रिसमसच्या काळातलं वागणं होतं. अनेकांसाठी त्या काळात असं वागणं वाईट मानलं जाई, एकदम निषिद्ध.

कोण आहेत 'खरे ख्रिश्चन'?

त्यामुळे 1644 साली अतिधर्मनिष्ठ ख्रिश्चनांनी ख्रिसमस साजरा करण्याची परंपराच बंद करण्याचा निर्णय घेतला. धर्माच्या नियमांचं कडक पालन व्हावं, असं प्रोटेस्टंट ख्रिश्चन लोकांना वाटायचं.

25 डिसेंबर रोजी ख्रिसमस हा बायबलनुसार येशूचा जन्मदिवस म्हणून साजरा न करता, त्या दिवसाला धार्मिकदृष्ट्या वेगळं महत्त्व आहे, असा प्युरिटन म्हणजे अतिधर्मनिष्ठ सरकारचा ख्रिसमसला आग्रह होता. त्यांच्या तारखेच्या मुद्द्यातही तथ्य होतं, पण त्याकडे आपण नंतर वळूया.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ख्रिसमस ही रोमन परंपरा आहे असं कट्टर धर्मपंडितांना वाटत असे.

इंग्लंडमध्ये 1660 पर्यंत ख्रिसमससंदर्भातील सर्व घडामोडींवर बंदी होती. 25 डिसेंबर रोजी दुकानं आणि बाजार जबरदस्ती सुरू ठेवले जायचे तर अनेक चर्च बंद. इतकंच काय, ख्रिसमस सर्व्हिसचं आयोजन करणंही अवैध ठरवण्यात आलं होतं.

पण या बंदीसत्राला सहजपणे स्वीकारलं गेलं नाही. ख्रिसमसला दारू पिणे, मजा करणे, नाचण्या-गाण्याच्या स्वातंत्र्यासाठी लोक आवाज उठवू लागले.

याचा परिणाम असा झाला की दुसरे चार्ल्स राजेपदावर आल्यानंतर त्यांनी हा ख्रिसमसविरोधी कायदा मागे घेतला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ख्रिसमससाठी झाडाचे पान तोडल्याबद्दल एका लहान मुलाला कट्टर धर्मपंडित ओरडत आहेत.

ख्रिसमसवर अशीच बंदी अमेरिकेतही घालण्यात आली होती. हो! ख्रिसमस साजरा करण्यावर अमेरिकेतील कडव्या धर्मनिष्ठांचीही नजर होती.

यामागची कारणं तीच जी इंग्लंडमध्ये होती. त्याच कारणांमुळे मॅसेच्यूसेट्समध्ये 1659 ते 1681 पर्यंत ख्रिसमस साजरा केला गेला नाही.

ख्रिसमसवर बंदी घालणारा कायदा मागे घेण्यात आला, तरीही अतिधर्मनिष्ठ लोक डिसेंबरमधील या उत्सवी वातावरणाला ख्रिश्चनविरोधी लोकांचं घृणास्पद कृत्य मानायचे.

येशूचा जन्मदिन खरा जन्मदिवस कोणता?

येशूचा जन्म नक्की कधी झाला यावर एकमत नाही.

जेव्हा येशूचा जन्म झाला, तेव्हा मेंढपाळ मैदानी प्रदेशात आपल्या मेंढ्यांची देखरेख करायचे, असा उल्लेख आहे. त्यामुळे येशूचा जन्म वसंत ऋतूत झाला असावा, असे काही धर्मपंडित मानतात. जर तो काळ डिसेंबरच्या थंडीचा असता तर मेंढपाळ एखाद्या जागी आश्रयाला राहिले असते.

मेढ्यांच्या विणीच्या काळात मेंढपाळ त्यांची काळजी घेतात. त्यांना इतर कळपापासून दूर करण्याच्या कामात ते व्यग्र असतात. हा सर्व काळ पानगळीचा असतो. परंतु बायबलमध्ये येशूचा जन्मदिवसाचा कोणताही उल्लेख नाही.

मूर्तीपूजनाची परंपरा

डिसेंबरच्या शेवटी मूर्तीपूजन परंपरेचा भाग म्हणून जोरदार पार्टी करण्याची पद्धत रोमन काळापासूनच चालत आली होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रोमन लोक जोरदार पार्टी करत असत हे दाखवणारं 19 व्या शतकातलं रेखाचित्र

खरंतर हा का उत्सव सुगीचा असायचा. यामध्ये एकमेकांना भेटवस्तू दिल्या जायच्या, घरांना फुलांच्या माळांनी सजवलं जायचं, भरपूर खाणं-पिणं आणि दारूची पार्ट्या व्हायच्या.

इतिहासतज्ज्ञ सायमन सीबग मोन्टेफिअर यांच्या मते, सुरुवातीच्या काळात ख्रिश्चन नसलेले लोक ज्या प्रमाणे मौजमजा करायचे, त्याचप्रमाणे मौज करण्याचा प्रयत्न ख्रिश्चन लोक करायचे. रोमन लोकांनी हळूहळू मूर्तीपूजा सोडली आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मात्र या संक्रमणकाळामध्ये मूर्तीपूजकांचे कॅलेंडर हळूहळू ख्रिश्चन कॅलेंडरमध्ये रूपांतरित होत गेले.

एकेकाळपर्यंत तर रोमन दोन्ही परंपरांनुसार सोहळे साजरे करत होते. चौथ्या शतकाच्या शेवटपर्यंत मूर्तीपूजक आणि ख्रिश्चन परंपरा डिसेंबरचे चौदा दिवस एकत्रच साजर केल्या जायचे.

मात्र त्यामुळे कोणताही संघर्ष झाला नाही.

जय आणि पराजय

यामध्ये शेवटी ख्रिश्चन परंपरांचा विजय झाला. 17व्या शतकात ख्रिसमसविरोधात मोहीम सुरू झाली. अतिधर्मनिष्ठांच्या नजरेत ख्रिसमस हा मूर्तीपूजक परंपरेचेच चिन्ह होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ख्रिसमसमधील पार्टीवरील 19 व्या शतकातील एक व्यंगचित्र

आज मात्र ख्रिसमस एकदम धूमधडाक्यात साजरा केला जातो. याचाच अर्थ प्युरिटन म्हणजे कट्टर धर्मनिष्ठ पराभूत झाले आहेत. आज जरी जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सजवलेल्या ख्रिसमस ट्री जवळ बसूव वाईन आणि टर्कीचा आस्वाद घेतला जात असेल. तरीही ही परंपरा 2000 वर्षं जुनी आहे, हे लक्षात असावं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)