लग्न झालेली माणसं जास्त खूश असतात?

जोडीदार Image copyright Getty Images

तुम्ही जीवनात अशा वळणावर आहात की तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला सहभागी करून घ्यायचं तर आहे, पण तुम्हाला खालील प्रश्न पडले आहेत.

ऑनलाईन डेटिंग अॅप तुम्हाला अधिक आकर्षक जोडीदार दाखवतील?

जोडीदाराच्या अनुरुप असणं योग्य असतं का?

लग्न झालेली माणसं खूश असतात का?

एकाच व्यक्तीसोबत संपूर्ण जीवन व्यतीत करणं तुमच्यासाठी खरंच चांगलं आहे?

या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चकित करू शकतात. बीबीसीनं एका संशोधनाद्वारे या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

माझ्या टाईपचा मुलगा किंवा मुलगी

डिजिटल युगात ऑनलाईन डेटिंगचं प्रमाण वाढलं आहे. आज बहुतेक जण इंटरनेटवर जोडीदार शोधत आहेत. पण लाखो लोकांमध्ये तुम्हाला तुमचा स्वत:चा लूक भीतीदायक वाटू शकतो.

पण घाबरायचं कारण नाही. तुम्ही जेव्हा केव्हा नवीन फोटो पाहता तेव्हा तो जुन्या फोटोपेक्षा चांगलाच दिसतो. याचा अर्थ सौंदर्याशी निगडित आपला विचार अनुवांशिक नसून काळानुरुप बदलणारा असतो.

डेटिंग अॅपवर प्रत्येक क्षणी बदलत्या फोटोंच्या वेगानं आपला सौंदर्याचा दृष्टीकोन बदलत जातो.

Image copyright Getty Images

त्यामुळे सुंदर लोकांचे फोटो पाहून तुमच्या मनात वाईट भावना येत असतील तर वाईट वाटायचं कारण नाही. कारण ही बाब काही वेळेपुरती मर्यादित असते. चिरस्थायी नसते.

बहुतेकदा लोकांना पाहिल्या पाहिल्या एखादा फोटो प्रचंड आवडतो. तुम्हालाही ही संधी अचानक लाभू शकते.

आपण ज्या चेहऱ्यांना कमीत कमी बघत असतो, तेच आपणाला आकर्षक वाटत असतात.

मनोविकार तज्ज्ञांच्या मते, आपण ज्या चेहऱ्यांना वेगानं बघत पुढे जातो, कधीकधी त्यांनाच पुन्हा पाहण्याची इच्छा मनात जागृत होते.

आपण आपल्या संभाव्य जोडीदाराला मिस नको करायला, हे यामागचं कारण असतं.

विपरित मूडचा परिणाम

काही खास सवयी असतात ज्या दोघांकडेही असल्यास चांगलं समजलं जातं. पण तुमचे विचार जोडीदारापेक्षा वेगळे असावेत आणि हे चांगलं असतं असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे.

Image copyright Getty Images

सारखीसारखी चीडचीड करण्याची सवय कुणाला पसंत पडेल? जर कुणी होकार द्यायला उशीर लावत नसेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

जी माणसं जास्त फिकीर करतात त्यांना स्वत:ला नाकारलं जाण्याची भीती वाटत असते. अशा लोकांना त्यांच्या सारख्या विचारांचे जोडीदार मिळाल्यास त्यांनी या गोष्टीची खात्री पटते.

रात्री उशीरापर्यंत जागणं किंवा सकाळी लवकर उठण्याची सवय दोघांनाही असेल तर हीसुद्धा मजेशीर बाब आहे. यामुळे एकमेकांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळते.

पण यामुळे त्रासही होऊ शकतो. जर कुणी कामाला जास्तच वाहून घेतलं असेल आणि त्यांचा जोडीदारही तसाच असेल तर संवाद बिघडू शकतो. अशावेळी दोघांपैकी एक जोडीदार जास्त फिकीर करत नसेल तर दोघांचंही चांगलं पटतं.

लग्नानंतर आनंद वाढतो , पण...

तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघांचेही विचार पटत असतील तर तुम्ही लग्न करता. पण यामुळे आनंद वाढतो का?

लग्न केल्यानंतर आपल्या भूमिकेत स्थायी स्वरुपाचा बदल होतो. एका संशोधनानुसार ही बाब सिद्ध झाली आहे. जर्मन लोकांवर झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे की, लग्नानंतर माणसांचं बाहेर फिरणं कमी होतं. माणसातील खुलेपणा कमी होतो.

Image copyright Getty Images

लग्नानंतर लोक माफ करायला शिकतात. स्वत:वर नियंत्रण मिळवायलाही शिकतात. दीर्घकाळासाठी कुणासोबत एखादं नातं ठेवायचं असेल तर या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

लग्नानंतर काही दिवसांनी लोक समाधानी आणि आनंदी दिसतात. पण ही बाब स्थायी नसते. लग्नानंतर काही वर्षांनी ही माणसं परत त्याच स्थितीत परततात जिथं ते लग्नापूर्वी असतात.

याचा अर्थ लग्नामुळे स्थायी स्वरुपाचा आनंद मिळत नाही.

लग्नानंतर वेगळे होण्याचा परिणाम

जे लोक लग्नानंतर समाधानी असतात ते वेगळं झाल्यानंतर मोठ्या स्वरुपाचा बदल दाखवतात. घटस्फोटानंतर महिला खूपच मोकळ्या आणि बेधडक होतात.

पुरुषांना मात्र वेगळं झाल्यानंतर सावरणं अवघड जातं. ते खूपच तापट स्वभावाचं वर्तन करतात.

Image copyright Getty Images

घटस्फोटानंतर स्त्री-पुरुष दोघंही कमी विश्वासदायक राहतात.

जोडीदारानं घटस्फोट घेतल्यानंतर तुम्ही स्वत:ला कसं सांभाळता हे तुमच्या विचारांवर अवलंबून असतं. जे लोक बहिर्मुख असतात ते लवकरच दुसरं लग्न करतात.

पण सनकी माणसं मात्र घटस्फोटानंतर अनेकांशी कमी वेळासाठीचं नातं बनवतात. याचा अर्थ स्थायी संबंध बनवणं त्यांच्यासाठी अडचणीचं असतं.

रोमॅन्सपूर्ण भविष्य

एकाच जोडीदारासोबत जीवन व्यतीत करणं प्रत्येक समाजात आदर्श मानलं जातं. पण नव्या जमान्यात एकाच वेळी अनेकांशी संबंध ठेवणं प्रचलित आहे.

Image copyright Getty Images

यात नेहमीच काही धोका वैगेरे असतो असं नाही. काही नात्यांत सहभागी लोक एक-दुसऱ्याच्या सहमतीनं एकाहून अधिक लोकांशी नातं ठेवतात.

प्रेमाशिवाय असं नातं ठेवणाऱ्या लोकांमध्ये घनिष्ठ मैत्री असते. असेच लोक अधिक सुरक्षितरित्या सेक्स करतात.

पण एकाच वेळी तुम्ही अनेकांशी नातं ठेवून नसाल तर निराश व्हायचं कारण नाही. तुम्ही काही चूक करत आहात, असा याचा अर्थ होत नाही. एकाच वेळी अनेक रोमँटिक संबंध ठेवणारी व्यक्ती अधिक खुल्या स्वभावाची असते.

दुसरीकडे एकाच व्यक्तीशी संबंध ठेवणारी माणसं कोणत्याही प्रकारच्या संकटात अडकण्याची शक्यता नसते. एकाच व्यक्तीशी असणारा समर्पण भाव त्यांना चांगलंच आनंदी ठेवत असतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)