रशियात ख्रिसमससाठी रेनडीअर भाड्यानं मिळणार

रेनडीअर

फोटो स्रोत, ROEV.RU

फोटो कॅप्शन,

या रेनडीअरना माणसांची सवय आहे.

ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रशियातील एका प्राणीसंग्रहालयाने चक्क रेनडीअर, कोल्हे आणि हस्की कुत्रे भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे.

सायबेरियातील क्रास्नोयार्क्स शहरामध्ये रोयेव रुचेई हे रशियालं सर्वांत मोठं प्राणीसंग्रहालय आहे. इथल्या प्राण्यांना शहरात कुठेही नेऊन लहान मुलांच्या पार्टीमध्ये फोटो काढण्याची संधी आता मिळणार आहे.

या प्राण्यांमध्ये सर्वाधिक पसंती रेनडीअरला आहे.

फोटो स्रोत, ROYEV RUCHEI/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

क्रास्नोयार्क्स येथील रेनडीअर.

यंदा क्रास्नोयार्क्समध्ये पारा चांगलाच घसरला असून बर्फही पडण्याची शक्यता आहे. रेनडीअर बाहेर जाण्यासाठी सज्ज असून त्यांच्यामुळे लोकांना कोणताही धोका नसल्याचं प्राणीसंग्रहालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्राणीसंग्रहालयाचे येकाटेरिना मिखाइलोवा यांनी चॅनल 7ला माहिती देताना सांगितलं, "प्राण्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीस, त्यांच्याशी कसे वागायचे हे माहिती असणाऱ्या व्यक्तीला आणि प्राणी पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांनाही ते सांभाळता येत असतात."

फोटो स्रोत, KRASNOYARSK CHANNEL 7

फोटो कॅप्शन,

प्राणी हाताळण्याचा अनुभव असणारी एक व्यक्ती रेनडीअरबरोबर नेहमी असते.

घरी नेण्यासाठी फक्त रेनडीअरच उपलब्ध आहेत. रेनडीअरसाठी यजमानांच्या घरी खोली असणं गृहीत धरलं असून तिथं रेनडिअरबरोबर फोटो काढता येतील.

सध्या सर्वच रेनडीअरना शिंगे नाहीत. त्यामुळे फोटोसाठी शिंगे असणाऱ्या रेनडिअरची निवड करावी लागते. "जर अगदीच लहान मुले रेनडिअरजवळ येणार असतील तर आम्ही अत्यंत शांत रेनडीअरची निवड करतो", असं मिखाइलोवा यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)