व्हॉट्सअॅप 2019 मध्ये या फोन्सवर बंद होणार आहे

व्हॉटसअॅप

फोटो स्रोत, MANAGED (PROJECT-LICENSE)

तुमचं आमचं व्हॉट्सअॅप सतत अपडेट होत असतं. आणि आता असा एक अपडेट येतोय, ज्यामुळे अनेकांचं व्हॉट्सअॅप वापरणं बंद होऊ शकतं.

तर झालं असंय की व्हॉट्सअॅपने नुकतीच ब्लॅकलिस्ट केलेल्या काही सेलफोन्सची यादी जाहीर केली असून 1 जानेवारीपासून त्या फोन्सवर या अॅपची सर्व्हिस उपलब्ध होणार नाही.

बहुसंख्य लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या मोबाइल फोन प्लॅटफॉर्म्सवर लक्ष केंद्रित करण्याबद्दल व्हॉटसअॅपने सूचित केलं होतंच.

त्यामुळेच नोकिया S40 या ऑपरेटिंग सिस्टिमवर व्हॉट्सअॅप 31 डिसेंबर 2018 पर्यंतच उपलब्ध राहील, असं व्हॉट्सअॅपने ब्लॉगमध्ये स्पष्ट केलं आहे.

1999 मध्ये नोकियाने S40 हे ऑपरेटिंग सिस्टिम तयार केलं होतं. लक्षावधी लोकांच्या सेलफोनमध्ये त्याचा वापर झाला होता. त्यामध्ये नोकिया 206, 208, नोकिया 301, नोकिया 515 तसेच नोकिया अशा C3, X2, X3 यांचा समावेश आहे.

अजूनही आधुनिक स्मार्टफोनला पर्याय म्हणून हे फोन विकले जातात.

फोटो स्रोत, MANAGED (PROJECT-LICENCE)

आयफोन 4

व्हॉट्सअॅपच्या अशाच काही बदलांमुळे अॅपलच्या आयफोन 4 वरही परिणाम होण्याची शक्यता आहे. जरी ते फोनमध्ये वापरात असले तरी लवकरच ते बंद होण्याची शक्यता आहेत.

आता नव्याने अॅपल सॉफ्टवेअरचे जुनी कोणतीही आवृत्ती किंवा iOS 7,आयफोन मॉडेल वापरणाऱ्यांना व्हॉट्सअॅप उपलब्ध होणार नाही. तसंच 2020 नंतर व्हॉट्सअॅप या फोनसाठी पूर्णपणे बंद होईल.

फोटो स्रोत, MANAGED (PROJECT-LICENSE)

फोटो कॅप्शन,

तुमच्याकडे आयफोन4 असेल तर तुमचे व्हॉटसअॅप बंद होईल.

आयफोनवर व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी iOS8 किंवा त्या पुढील वर्जन लागतं. iOS7.1.2 मध्ये नवी अकाउंट तयार करणं शक्य होणार नाही. जर तुमच्या फोनमध्ये ते आधीपासूनच असेल तर तुम्ही 1 फेब्रुवारी 2020 पर्यंतच वापरू शकाल.

iOS6 मध्ये ते याआधीच थांबविण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅपसाठी iOSचे अद्ययावत वर्जन वापरावे, असे कंपनीने सुचवले असून आयफोन सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी अॅपलच्या हेल्प पेजचा आधार घेण्यास सांगितलं आहे.

अँड्रॉइड 2.3.7

जर तुमच्या फोनमध्ये अँड्रॉइड 2.3.7 किंवा त्या आधीचं वर्जन असेल तसंच iOS 7.1.2 असेल, तर तुम्ही केवळ 1 फेब्रुवारी 2020 पर्यंत व्हॉट्सअॅप वापरू शकाल.

जागतीक माहितीनुसार, अँड्रॉइड 2.3.7 आणि त्याआधीचे ऑपरेटिंग सिस्टिम वापरणारे जगभरात जवळपास दोन अब्ज फोन आहेत.

फोटो स्रोत, MANAGED (PROJECT-LICENCE)

डिसेंबर 2010 मध्ये सॅमसंगने अॅड्रॉइड 2.3.7 हे ऑपरेटिंग सिस्टिम नेक्सस S द्वारे बाजारात आणले होते. त्या ऑपरेटिंग सिस्टिमला जिंजरब्रेड नावानेही ओळखलं जातं.

त्यानंतर अँड्रॉइड 3.0 (किंवा हनीकोंब) फेब्रुवारी 2011मध्ये आलं.

त्यामुळे जर तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरायचं असेल तर तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अपग्रेड करावी लागेल. आणि बहुदा नवा फोनही घ्यावा लागू शकतो.

व्हॉटसअप कोणकोणत्या फोनवर उपलब्ध आहे?

  • अँड्रॉइड 4.0 आणि त्यानंतर आलेले ऑपरेटिंग सिस्टिम असलेले फोन
  • iOS8 आणि त्यापुढचे ऑपरेटिंग सिस्टिम असणारे आयफोन
  • 8.1 किंवा त्यापुढील ऑपरेटिंग सिस्टिम असणारे विंडोज फोन
  • जिओफोन आणि जिओफोन 2

(स्रोतः व्हॉट्सअॅप आणि नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)