ट्रेंट बोल्ट : 15 चेंडूंमध्ये घेतल्या सहा विकेट

ट्रेंट बोल्ट

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन,

ट्रेंट बोल्ट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. तसंच चेतेश्वर पुजाराने केलेल्या शतकाची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. मात्र न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यातील गोलंदाजीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

ख्राइस्टचर्च इथं श्रीलंकेच्या विरोधात ट्रेंट बोल्टने उत्तम गोलंदाजी करत 15 चेंडूमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत. तसंच या 15 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा त्यानं दिल्या आहेत.

श्रीलंकेच्या विरोधात गुरुवारी लेफ्ट स्विंगची कमाल दाखवत ट्रेंटनेही कामगिरी केली आहे. त्याच्या गोलंदाजीत एका षटकामध्ये तर त्याने एकही धाव न देता 3 विकेट घेतल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

रोशन सिल्वा, निरोशन डिकवेला, दिलरुवान परेरा, सुरंगा लकमल, दुश्मंता चमिरा आणि लाहिरू कुमारा यांना तंबूत पाठवण्यात त्याला यश आलं. या डावामध्ये बोल्टने एकूण 15 षटकांमध्ये 30 धावा दिल्या आणि 6 विकेटस घेतल्या.

आयसीसीने केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, ट्रेंट बोल्टने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ठ गोलंदाजी करत 30 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. 45 मिनिटांपूर्वी त्याच्या नावावर एकही विकेट नव्हती.

त्यानंतर ट्रेंट बोल्ट भारतामध्येही ट्वीटर ट्रेंडवर आला. या कामगिरीमुळे त्याची मोठी प्रशंसा होत आहे. ट्रेंट बोल्ट डावखुरा डेल स्टेन आहे, अशा शब्दांमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट समीक्षक डेनिस बोल्ट यांनी त्याचे कौतुक केलं आहे.

थोडं टेस्ट क्रिकेट पाहाण्याचा मी विचार केला. ट्रेंट बोल्टच्या चेंडूंवर श्रीलंकेचे 5 खेळाडू लगेचच तंबूत परतले. यातले 4 एलबीडब्ल्यू होते, असं लॉरेन्स बूथ यांनी ट्वीट केलं आहे.

बोल्टच्या उत्कृष्ठ गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला या निर्णायक कसोटीच्या पहिल्या डावात 74 धावांची आघाडी मिळाली आहे. न्यूझीलंडच्या संघानं पहिल्या डावामध्ये 178 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ केवळ 104 धावाच करू शकला.

दुसऱ्या डावामध्ये न्यूझीलंड चांगली फलंदाजी करायला सुरुवात केली आहे.

हे वाचलंत का?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)