तुलसी गबार्ड : अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार बनू इच्छितात राष्ट्राध्यक्ष

तुलसी गबार्ड Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तुलसी गबार्ड

अमेरिकेतील हवाई प्रांताच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी 2020मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांची दावेदारी जाहीर करणार आहेत. तुलसी गबार्ड यांनी दावेदारी जाहीर केल्यानंतर त्यांचं नाव ट्रेंड होऊ लागलं आहे. अमेरिकेच्या सीनेटमध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या हिंदू महिला आहेत.

लष्करात कार्यरत असलेल्या तुलसी यांची राजकीय कारकिर्द लक्षवेधी आहे.

2016 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांच्याऐवजी बर्नी सँडर्स यांना समर्थन देणाऱ्यांमध्ये गबार्ड यांचा समावेश होता. 2016मध्ये त्या डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या उपाध्यक्ष होत्या. सँडर्स यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.

1981मध्ये अमेरिकेच्या समोआ येथे जन्मलेल्या तुलसी गबार्ड अमेरिकेच्या सर्वांत युवा खासदार ठरल्या होत्या. त्यावेळी त्यांचं वय 21 वर्षं होतं.

भारताशी संबंध

स्टेट सिनेटर माईक गबार्ड यांची मुलगी असलेल्या तुलसी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात पवन आणि सौर ऊर्जेसाठी आवश्यक उत्पादनांना करातून सवलत मिळावी यासाठी तयार झालेल्या कायद्याला समर्थन दिलं होतं.

त्यानंतर तुलसी गबार्ड यांनी हवाई आर्मी नॅशनल गार्ड सर्व्हिसमध्ये सहभागी होत इराक युद्धात भाग घेतला होता.

2015मध्ये त्या सैन्यात मेजर पदापर्यंत पोहोचल्या. त्या अजूनही सैन्यात कार्यरत आहे.

Image copyright Instagram/TulsiGabbard

तसं पाहिलं तर तुलसी यांचा भारताशी फारसा संबंध नाही. त्यांचे आईवडील भारतीय वंशाचे नाहीत.

मात्र हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे तुलसी गबार्ड यांना अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांचा पाठिंबा मिळतो. अमेरिकेच्या संसदेत जाणाऱ्या पहिल्या हिंदू महिला म्हणून त्या ओळखल्या जातात.

मागच्या वर्षी अमेरिकेत एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात हिंदूंच्या विरोधात झालेल्या एका टिप्पणीचा त्यांनी कडाडून विरोध केला होता.

मोदींशी कसे आहेत संबंध?

तुलसी गबार्ड भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थक आहेत. मोदी पंतप्रधान होण्याआधीपासूनच त्या मोदींच्या समर्थक आहेत.

अमेरिकेच्या सरकारने 2002मध्ये दंगलींनंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. या निर्णयाला विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये तुलसी आघाडीवर होत्या.

मागे भारताच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी मोदींची भेटही घेतली होती. त्याचप्रमाणे जेव्हा मोदींनी अमेरिकेचा दौरा केला तेव्हा त्यांनी गबार्ड यांची भेट घेतली होती. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्याही त्या समर्थक आहेत.

काही वर्षांपूर्वी तुलसी हिंदू रीतिरिवाजानुसार विवाहबद्ध झाल्या.

गबार्ड यांची राजकारणाची पद्धत कशी आहे?

गबार्ड यांच्या राजकारणाचा विचार केला असता असं लक्षात येतं की रिपब्लिकन पक्षाच्या लोकांना त्या भावतात मात्र डेमोक्रॅटिक पक्षाचा त्यांच्यावर वचक नाही.

Image copyright TULSI2020.COM

2016मध्ये सॅंडर्स यांचं समर्थन करताना त्यांनी डीनसीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाने हिलरी क्लिंटन यांना निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)