ब्राझीलमध्ये धरण फुटून 34 ठार, 200 बेपत्ता : पाहा मन हेलावणारी दृश्यं

ब्राझीलमध्ये धरण फुटून 7 मृत्युमुखी Image copyright Getty Images

ब्राझीलच्या एका लोहाची खाणीजवळचं धरण फुटून अनेक गावं चिखलाखाली गेली आहेत. मेनस जेराईस राज्यात ब्रुमाडिनो शहराबाहेरील या दुर्घटनेत 200 हून अधिक जण बेपत्ता असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आतापर्यंत 34 लोकांचे मृतदेह हाती आले आहेत.

बचाव पथकानं चिखलात फसलेल्या अनेक जणांची सुखरूप सुटका केली आहे.

ब्राझीलमध्ये धरण फुटून 7 मृत्युमुखी Image copyright Getty Images

ब्राझीलमधील मोठी कंपनी वेलची ही खाण आहे. ज्यावेळी हे धरण फुटलं, त्यावेळी वेल कंपनीतील मजूर दुपारचं जेवण करत होते. धरणफुटीमुळे तयार झालेल्या चिखलात कँटीन दबली आहे, असं कंपनीच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये धरणाच्या बांधकामाची तपासणी करण्यात आली होती आणि धरण सुस्थितीत असल्याचं सांगण्यात आलं होतं, असं ते सांगतात.

ब्राझीलमध्ये धरण फुटून 7 मृत्युमुखी Image copyright AFP

ब्रुमाडिनो धरण तुटल्यामुळे मेनस जेराईस राज्यातील अनेक गावांत चिखल साचला आहे. आपत्तीग्रस्त गावांतील लोकांच्या मदतीसाठी टीम पाठवण्यात आली आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

जवळच्या लोहा खाणीच्या सफाईसाठी या धरणातील पाण्याचा केला जातो.

ब्राझीलमध्ये धरण फुटून 7 मृत्युमुखी Image copyright Reuters

कंपनीच्या माहितीनुसार, या श्रेत्रात अनेक नवीन धरण तयार करण्यात आले होते. यांतील एक ब्रुमाडिनो हा होता.

1976मध्ये तयार करण्यात आलेल्या या धरणाची क्षमता 20 लाख क्युबिक मीटर होती. पण तो फुटल्यामुळे त्यातून किती चिखल बाहेर पडला, याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही.

ब्राझीलमध्ये धरण फुटून 7 मृत्युमुखी Image copyright Reuters

टीव्हीवरील फुटेजवरून लक्षात येतं की, चिखलाचा एक मोठा लोंढा वाहतोय आमि वाटेत येणाऱ्या घरांना गिळंकृत करतोय.

राष्ट्राध्यक्ष झेयर बोल्सोनारो परिस्थितीची पाहणी करण्यासाठी या भागाचा दौरा करणार आहेत. दरम्यान, या राज्यात 3 वर्षांपूर्वी धरणफुटीमुळे 19 जणांचा मृत्यू झाला होता.

ब्राझीलमध्ये धरण फुटून 7 मृत्युमुखी Image copyright EPA

.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)