'धोनी-विराटशिवाय टीम इंडिया चांगली कामगिरी करू शकत नाही'

मॅच Image copyright Getty Images

न्यूझीलंडमधल्या हॅमिल्टनमध्ये सुरू असलेल्या सामन्यात भारतीय सघांचा 92 धावांमध्येच ऑलआऊट झाला आहे. परिणामी सोशल मीडियावर भारताच्या संघावर तोंडसुख घेण्यास सुरूवात झाली आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये न्यूझीलंडविरोधातल्या वनडेचं रोहित शर्मा नेतृत्व करत आहे. न्यूझीलंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली पण संघाला 100 धावा सुद्धा करता आल्या नाहीत.

ट्विटरवर अनेकांनी टीम इंडियावर टिका सुरू केली आहे. मोहित यांनी हा टीम इंडियासाठी वर्ल्ड कपआधी मोठा धडा असल्याचं म्हटलं आहे.

महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहलीशिवाय टीम इंडिया चांगली कामगिरी करू शकत नाही, असं चार्मी छेडा यांना वाटतं.

धोनीच्या चाहत्यांनी मात्र त्याची कमी जाणवत असल्याचा सूर आळवला आहे.

या सामन्यातील पहिल्या 8 विकेटमध्ये रोहित शर्मा केवळ 7 धावा करून तंबूत परतला.

त्यानंतर शिखर धवन 13, शुभमन गिल 9 धावांवर बाद झाले. केदार जाधव केवळ 1 धाव घेऊन तर हार्दिक पंड्या 16 धावांवर बाद झाले. अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक खातंही उघडू शकले नाहीत. ट्रेंट बोल्टने 5 विकेटस घेतल्या आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)