किम जाँग-उन आणि रॉड्रिगो डुटर्टे यांचे डुप्लिकेट जेव्हा एकमेकांना भेटतात - फोटो

हॉवर्ड एक्स आणि क्रेसेन्सियो एक्स्ट्रीम Image copyright EPA
प्रतिमा मथळा किम जोंग उन आणि रॉड्रीगो डुटर्टे यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्ती

फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम-जाँग-उन या दोघांनाही हॉंगकॉंगच्या रस्त्यांवर बघून अनेकांचा गोंधळ उडाला. एका ठिकाणी ते चक्क फ्राइड चिकन खाताना आणि कोल्डड्रिंक्स पिताना दिसले.

अनेकांना वाटलं की 'अरे! हे दोन मोठे नेते असे हॉंगकॉंगच्या रस्त्यांवर काय करत आहेत?'

पण थांबा, नीट पाहिल्यावर हे लक्षात येईल की हे दोघेही तोतये आहेत!

हे होते 'डुटर्टे' यांच्यासारखे दिसणारे क्रेसेन्सिओ एक्स्ट्रीम आणि किम जाँग-उन यांच्यासारखे दिसणारे हॉवर्ड एक्स.

काल हॉंगकाँगमध्ये या दोन राष्ट्राध्यक्षांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींना पाहायला लोकांची झुंबड उडाली होती. त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

हॉवर्ड एक्स आणि क्रेसेन्सियो एक्स्ट्रीम Image copyright EPA

त्या चिकन रेस्टोरंटमध्ये या दोघा तोतयांनी खोट्या रायफलही हातात घेतल्या होत्या.

हॉवर्ड एक्स आणि क्रेसेन्सियो एक्स्ट्रीम Image copyright Getty Images

डुटर्टे नेहेमी पांढरा शर्ट घालतात. त्याचप्रमाणे या तोतयानेही पांढरा शर्ट घालून चर्चमध्ये प्रार्थना केली.

हॉवर्ड एक्स आणि क्रेसेन्सियो एक्स्ट्रीम Image copyright Getty Images

डुटर्टे यांच्यासारख्या दिसणाऱ्या तोतयाबरोबर सेल्फी काढण्यासाठी लोकांमध्ये झुंबड उडाली होती.

हॉवर्ड एक्स आणि क्रेसेन्सियो एक्स्ट्रीम Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 'अरे हे तर डुटर्टे....?'
हॉवर्ड एक्स आणि क्रेसेन्सियो एक्स्ट्रीम Image copyright EPA

मग त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन चिकनवर ताव मारला. आणि बरेच फोटोही काढले.

एवढे फोटो पाहून तुम्हालाही खरे डुटर्टे आणि किम कसे दिसतात, याचा जरा विसर पडला असेल तर हे घ्या...

डुटर्टे Image copyright EPA
प्रतिमा मथळा फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे - डावीकडे खरे आणि उजवीकडे तोतया
किम जोंग उन Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाँग-उन - डावीकडे खरे आणि उजवीकडे तोतया

सर्व फोटोंना कॉपीराइट लागू आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)