चंद्रावर संसार थाटण्यासाठी सुरू आहे लगीनघाई

चंद्रावरील तळ भूपृष्ठाच्या आत असेल. अंतराळातील किरणोत्सर्गांपासून बचाव करण्यासाठी असा तळ आवश्यक असणार आहे. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चंद्रावरील तळ भूपृष्ठाच्या आत असेल. अंतराळातील किरणोत्सर्गांपासून बचाव करण्यासाठी असा तळ आवश्यक असणार आहे.

1975ला ब्रिटिश टेलेव्हिजनवर Space 1999ही मालिका सुरू झाली. चंद्रावर अणुस्फोट होतो आणि चंद्रावरील मानवी वसाहतीतील 300 लोकांचा अज्ञात अंतराळात प्रवास सुरू होतो, अशी या मालिकेची सुरुवात होते.

या मालिकेचा लहान एलॉन मस्कवर नक्कीच प्रभाव पडला होता. ऑगस्ट 2017ला जेव्हा स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी चंद्रावर अल्फा या नावाने चंद्रावर तळ बनवण्याची घोषणा केली त्यावेळी Space 1999 ही मालिका आवडली होती, असं ट्वीट केलं होतं.

चंद्रावर मनुष्य नेण्याची कल्पना मांडणारी 'स्पेस एक्स'ही एकमेव कंपनी नाही. चीनची अंतराळ संशोधन संस्था China National Space Administrationने यशस्वी चंद्रमोहीम Chang'e 4च्या पुढच्या टप्प्याची घोषणा केली आहे. Chang'e 4ने चंद्राच्या विरुद्ध भागावर यशस्वी लँडिंग केलं होतं.

Chang'e 5 आणि Chang'e 6 परतीच्या मोहिमेची चाचणी असेल तर Chang'e 7 ही मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या रूपात पाणी असल्याने त्याकडे संशोधकांचं विशेष लक्ष आहे.

China National Space Administrationचे उपप्रमुख वू युहान म्हणाले होते, "Chang'e 8 या मोहिमेत काही तंत्रांची चाचणी घेईल आणि काही चाचपणी करेल. विविध देशांना वापरता येईल, असं तळ चंद्रावर उभारण्याचा आमचा मानस आहे."

पण अशी इच्छा बाळगणारा चीन हा एकमेव देश नाही. चंद्रावर मानवाने पाऊल ठेऊन 50 वर्षं झाल्यानंतर चंद्रावर प्रत्यक्षात मानवी तळ बनवण्यासाठीच्या शक्यतांवर प्रयत्न सुरू आहेत. विरोधाभास असा आहे की चंद्रावर पाऊल ठेवणारा देश असलेला अमेरिका यात मागं पडली आहे. 2018पर्यंत तरी अमेरिकेने चंद्रावर तळ बनवण्याचा कोणताही मानस जाहीर केलेला नाही. नासाचं सध्याचं टार्गेट मंगळ आहे, असं चित्र आहे. तर युरोपियन स्पेस एजन्सीनं यात एक पाऊल पुढं टाकलं आहे.

मून व्हिलेज

2016ला European Space Agencyने चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वसाहत बनवण्याची घोषणा केली आहे. या संस्थेचे महासंचालक जॅन वोर्नर यांनी मून व्हिजनची संकल्पना मांडली आहे. या मून व्हिलेजमध्ये संशोधक, कलाकार असे विविध प्रकारचे लोक असतील, अशी त्यांची कल्पना आहे. अवकाश संशोधन, पर्यटन, पृथ्वीवर कमी प्रमाणात असलेल्या खनिजांचा शोध यांचाही यात समावेश आहे.

खरंतर त्यांचा विचार बराच पुढचा आहे. MIT Media Lab's Space Exploration Initiativeचे संस्थापक एरियल एकब्ला यांना अंतराळाचं लोकशाहीकरण करायचं आहे. त्यांनी या प्रयत्नांत विविध क्षेत्रातील संशोधक, तज्ज्ञ यांना एकत्र केलं आहे.

European Space Agencyचे संशोधक सल्लागार यांनी या कल्पनांचा पुरस्कार केला आहे. जर्मनीतील European Space Agencyच्या European Astronaut Centreमध्ये त्यांनी काम केलं आहे.

European Space Agency चीनच्या CNSAसोबतही काम करत आहे. गेल्या वर्षी दोन्ही संस्थांच्या संशोधकांनी एकत्रित काही उपक्रांत भाग घेतला होता. नासाने 2030पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. चंद्राच्या भ्रमण कक्षेत फिरणारं एक प्लॅटफॉर्म बनवण्याचाही नासाचा प्रयत्न आहे.

अर्थात खासगी कंपन्याही यात आघाडी घेताना दिसत आहेत. उदाहरणार्थ ब्लू ओरिजिन या कंपनीनं OHB आणि MT Aerospaceशी भागीदारी केली असून चंद्रावर ब्लू मून कार्गो चंद्रावर उतरवण्याचा मानस आहे.

अर्थात जी ही संस्था चंद्रावर पहिल्यांदा पोहोचेल त्यांचा प्रयत्न एकच असेल ते म्हणजे चंद्रावर जगायचं कसं? आतापर्यंत चंद्रावर माणूस फक्त तीन दिवस राहू शकला आहे.

दीर्घकाळ राहण्यासाठी तर चंद्र काही स्वागतार्ह जागा नाही.

डेस्टिनेशन मून

चंद्रावर तापमान उणे 127 ते उणे 173 सेल्सिअस आहे. तिथं गुरुत्वाकर्षण आणि किरणोत्सर्ग अत्यंत कमी आहे. पृथ्वीवरील 29 दिवस म्हणजे चंद्रावरील एक दिवस होय. म्हणजे सौरऊर्जेचा वापर करायचा झाला तर चंद्रावर 2 आठवडे रात्र आणि 2 आठवडे दिवस असेल. चंद्रावर राहायचं झालं तर जे तंत्रज्ञान बनवायचं आहे, त्यात या परिस्थितीचा विचार करावा लागणार आहे.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून Blue Origin, Airbus Defence and Space and Esa या संस्थांनी एकत्रितपणे The Moon Race या संस्थेची स्थापनाही केली आहे. ही एक जागतिक स्पर्धा असणार आहे. चंद्रावर मानवी वसाहत स्थापण्यासाठी विविध पातळ्यांवर संशोधन व्हावं यासाठी औपचारिक पातळीवर या स्पर्धेची घोषणा ऑक्टोबर 2019मध्ये International Astronautical Congressमध्ये होणार आहे.

Airbusचे अभियंते पीअर अलेक्सि जौमेल म्हणाले, "ही स्पर्धा 5 वर्षांसाठी असेल. याचा उद्देश चंद्रावर सर्वोत्तम कल्पना नेणं हा आहे."

घरांची निर्मिती

चंद्रावरील मानवी तळ कसा असेल याची कल्पना कितीही केली असली तरी वस्तुस्थिती मात्र अगदी पायाभूत आहे. चंद्रापर्यंत प्रवास अत्यंत खार्चिक आहे. यासाठी जे यानं लागेल त्याचं वजन जितकं जास्त तितकं त्याला लागणारं इंधनही जास्त आणि खर्चही जास्त असं हे गणित आहे.

Image copyright Getty Images

त्यामुळे चंद्रावरील उपलब्ध साधनांचा वापर करून तिथं राहाता येण्यासारखं ठिकाण बनवणं जास्त योग्य ठरणार आहे. चंद्रावर कधीकाळी झालेल्या ज्वालामुखींच्या उद्रेकातील लाव्हा ट्यूब्जचा वापर राहण्यासाठी आणि चंद्राच्या भूपृष्ठाखाली दडलेल्या बर्फाच्या पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी करणं योग्य ठरणार आहे. चंद्रावरील बेसाल्टीक वाळू ही पृथ्वीवरील ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या वाळूसारखीच आहे, तिचाही उपयोग होऊ शकतो.

University of Cologneमधील प्रा. माथियास स्पर्ल जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था DLRसोबत काम करत आहेत. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या राखेतून विटा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 3D प्रिटिंगच्या मदतीनं या विटा बनवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या विटांतून इग्लूसारखा निवारा बनवता येईल.

या 3D प्रिंटिंगसाठी सौर ऊर्जा लागेल, त्यासाठी सूर्य किरणं पकडता यावीत यासाठी मोठी लेन्स लागणार आहे. लेन्सची संख्या वाढवून ही गती वाढवता येईल. तसेच या विटा एकत्र करून त्यातून स्ट्रक्चर बनवण्यासाठी आंतराळवीर किंवा रोबो लागतील.

पण तरीही एक स्ट्रक्चर बनवण्यासाठी लागणारा वेळ मोठा असणार आहे कारण एक वीट बनवण्यासाठीच पाच तासांचा वेळ लागणार आहे. ते सांगतात चंद्राच्या खडकाच्या वरचा थर वापरून काँक्रिटसारखं बळकट स्ट्रक्चर बनवता येऊ शकेल. सध्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्यातून इतकं बळकट स्ट्रक्चर उभं राहू शकत नाही.

सुदैवाने या वर्षाच्या अखेरीस ESAचंद्रावरील फॅसिलिटीची उभारणी सुरू करणार आहे, त्याचा उपयोग तंत्रज्ञानासाठी होणार आहे.

जगणार कसं?

चंद्रावर पाण्याचं बर्फ मिळालं आहे. नासानंही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे चंद्रावर कोणताही तळ निर्माण करायचा झाला तर तो या परिसरात केला जाईल. चीनचं Chang'e 4 या मोहिमेचं Yutu 2 रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर माहिती गोळा करत आहे, हा काही योगायोग नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चीनची अंतराळ मोहीम

चंद्रावर ऑक्सिजन मिळवणं हे एक आव्हान असणार आहे. चंद्राच्या खडकावर जे थर आहेत, त्यातून ऑक्सिजन मिळवता येईल. त्यातील Ilmenite हा चांगला ऑक्सिजनचा स्रोत ठरू शकतो. याची जर 1 हजार डिग्री सेल्सिअसला हायड्रोजनशी प्रक्रिया झाली तर पाण्याची वाफ बनते. त्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन बाजूला करता येईल.

सुरुवातीला अंतराळवीरांना चंद्रावर अन्न घेऊन जावं लागेल. Chang'e 4ने चंद्रावर काही बियांनांचं मोडं आणले होते. पण अंतराळात निरंतर असं अन्नाचं उत्पादन घेण्याची कल्पना नवीन नाही. 1982ला रशियातील अंतराळवीरांनी मोहरीची एका प्रजाती अंतराळात उगवली होती. 2010मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनाने अंतराळातील ग्रीनहाऊसचं प्रोटोटाईपही बनवलं होतं.

ऊर्जा

चंद्रावर ऊर्जा निर्माण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान लागणार आहे. पृथ्वीवर ज्या फ्युएल सेल्स आहेत त्यासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर प्रक्रिया करावी लागते आणि त्यातून पाणी उपपदार्थ निर्माण होतो. पण चंद्रावर वातावरण नाही.

अशा प्रकारचं तंत्रज्ञान निर्माण करणारे कॉवली म्हणतात चंद्रावर पाण्याचं विघटन करून ऊर्जा निर्माण करवी लागेल. औष्णिक ऊर्जा साठवण्याचा, आरसे किंवा लेन्सचा वापर करून सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचाहा पर्यायही असू शकतो.

एकदा तंत्रज्ञान निर्माण झालं तर चंद्रावरील वातावरणात त्यांच्या चाचण्या होतील, त्यानंतर अंतराळवीर चंद्रावर तळ उभारण्यासाठी याचा वापर करतील.

आणि विशेष म्हणजे तुम्ही जो विचार करत आहात त्यापेक्षा नजीकच्या भविष्यात हे घडू शकणार आहे!

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)