न्यूझीलंड : मशिदींवरील हल्ला एकाच व्यक्तीने घडवला?

न्यूझीलंड Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हल्ल्याच्या ठिकाणी लोक फुलं वाहत आहेत.

न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च इथल्या 2 मशिदीतील हल्ला एकाच व्यक्तीने घडवला असू शकतो, असा पोलिसांचा कयास आहे. शुक्रवारी झालेल्या या गोळीबारात 50 लोकांचा बळी गेला होता.

या संशयित हल्लेखोराचं नाव ब्रेन्टन टरांट (28) असं आहे. तो ऑस्ट्रेलियातील असून गौर वर्णियांना उच्च मानणारा आहे.

या प्रकरणात आणखी 3 जणांना अटक केली असून त्यांचा यात सहभाग नसावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पण याबद्दल आताच काही निष्कर्ष काढता येणार नाही, असं पोलीस आयुक्त माईक बुश यांनी म्हटलं आहे.

हल्ल्यातील 2 जखमींची प्रकृती गंभीर आहे.

अल नूर आणि लिनवूड मशिदीतील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, असं बुश म्हणाले. ही प्रक्रिया संवेदनशील आहे, असं ते म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी हे दोन्ही हल्ले दहशतवादी हल्ले असल्याचं सांगितलं

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी यापूर्वी देशात बंदूक बाळगण्याच्या कायद्यात बदल केला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

हा हल्ला अतिशय सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता. हल्लेखोराजवळ शस्त्रांचा परवाना होता. हल्ल्यात पाच बंदुकांचा वापर करण्यात आला.

त्याचवेळी शस्त्रांसकट एका व्यक्तीला अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीला सोडून देण्यात आलं आहे. ही व्यक्ती पोलिसांना मदत करू इच्छित होती असं तपासाअंती लक्षात आलं आहे.

'आमचं शहर बदललं आहे'

क्राईस्टचर्च च्या महापौर लिएन डायझील यांच्या मते मशिदीवर झालेल्या हल्ल्यामुळे शहराचा संपूर्ण चेहरामोहराच बदलला आहे.

शहरातील सगळे झेंडे अर्ध्यावर उतरवले जातील. तसंच शहरात होणाऱ्या खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हल्ल्याच्या ठिकाणी लोक फुलं वाहत आहेत.

महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितांवर ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिथून जवळच असलेल्या बॉटनिकल गार्डनची भिंत श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित केली जात आहे.

जगभरातून श्रद्धांजली

Image copyright PA
प्रतिमा मथळा क्राईस्टचर्च झालेल्या हल्ल्यात मारलेल्य गेलेल्या लोकांसाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
Image copyright Reuters
प्रतिमा मथळा जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये न्यूझीलंडच्या दुतावासासमोर निदर्शन करणारी एक व्यक्ती कुराणाची एक प्रत दाखवत आहे.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी ही श्रद्धांजली वाहिली.
Image copyright EPA
प्रतिमा मथळा पॅरिसच्या मशिदीत सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)