16 वर्षांच्या मुलीचं नोबेलसाठी नामांकन : पर्यावरणासाठी दर शुक्रवारी करते आंदोलन

ग्रेटा थुनबर्ग Image copyright AFP

हवामान बदल आणि तापमान वाढ अशा पर्यावरणाच्या समस्यांवर आंदोलन छेडणारी स्वीडनमधील 16 वर्षांची ग्रेएटा टूनबर्ग हिचं नामांकन शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी झालं आहे. नार्वेतील 3 खासदारांनी तिची शिफारस केली आहे.

जर ग्रेटाला हा पुरस्कार मिळाला तर सर्वांत कमी वयात नोबेल मिळवण्याचा मान तिला मिळणार आहे. पाकिस्तानची मलाला यूसुफजई हिला वयाच्या 17व्या वर्षी नोबेल मिळाला आहे.

ग्रेएटाने या नामांकनाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

नार्वेतील खासदार फ्रेडी आंद्रे ओस्टेग्राड म्हणाले, "जर हवामान बदल रोखण्यासाठी आपण काहीच केलं नाही तर त्यातून युद्ध, संघर्ष आणि निर्वासितांच्या समस्या उभ्या राहणार आहेत. ग्रेटाने यासाठी लोकचळवळ उभी केली. शांततेसाठी तिचं हे योगदान आहे."

ग्रेटा कोण आहे?

ग्रेएटाने ट्वीटवर स्वतःची ओळख 16 वर्षांची पर्यावरणप्रेमी कार्यकर्ती असा करून दिला आहे. तिला अस्पर्जर सिंड्रोम हा आजार असल्याचंही तिनं म्हटलं आहे. पर्यावरण संवर्धनासाठी तिनं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर तिने शुक्रवारी सतत आंदोलनं केली आहेत, त्यामुळे वर्षभरात कितीतरी शुक्रवार ती शाळेतही जाऊ शकलेली नाही.

दावोस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तिने हवामान बदलावर तिची भूमिका मांडली आहे. हवामान बदलासमोर आपण अपयशी ठरलो आहोत, हे मान्य करावं लागेल, असं ती म्हणाली होती. या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिची दखल घेतली आहे.

ग्रेएटाच्या आंदोलनाला Fridays For The Future असं नावं मिळालं असून हे आंदोलन विविध देशांत पोहोचलं आहे. जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये ही आंदोलनं झाली आहेत. शुक्रवारी जवळपास 100 देशांत हे आंदोलन झालं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
नोबेल पुरस्कारांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या

2014 मध्ये भाजप सरकार आलं, पण 2019मध्ये NDAचं सरकार येईल - संजय राऊत

16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं: धनंजय मुंडे

'महाराष्ट्र सरकारच्या अमृतमंथनामधलं विष माझ्या वाट्याला आलं'

मशीद हल्ल्यानंतर न्यूझीलंडमध्ये शस्त्रबंदीला पाठिंबा मिळणार?

विजयसिंह आणि रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये जाणार

पहिल्या विमान उड्डाणाच्या वर्षी या आजीचा जन्म झाला होता... - व्हीडिओ

'आता फक्त मोदी-शाहविरुद्ध प्रचार करा, त्याचा फायदा कुणालाही होवो'

'...तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार'

नायलॉन दोरीने घेतला वाघिणीचा जीव; दीड वर्षं होती जखमी