इथोओपियन एअरलाई्न्स अपघात : मृतदेह न मिळाल्याने अंत्यविधीसाठी माती दिली

इथोपिया Image copyright Reuters

इथोओपिअन एअरलाईन्सच्या दुर्घटनेत विमान अपघातात मृत पावलेल्या 157 लोकांचे मृतदेहच सापडले नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी कंपनीतर्फे माती देण्यात आली आहे.

अडिस अबाबा या ठिकाणी ही दुर्घटना जिथे झाली ती जागा श्रद्धांजली वाहण्यासाठी वापरण्याची मूभा दिली आहे.

मृतदेहांचे अवशेष शोधण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ लागेल असं कुटुंबीयांना सांगण्यात आलं आहे.

इथोओपियाचे वाहतूक मंत्री म्हणाले की अपघाताची कारणं शोधण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

"इतक्या मोठ्या अपघाताची कारणं शोधण्याचं काम काळजीपूर्वक करावं लागतं. त्यामुळे काहीतरी ठोस हाती येण्यासाठी वेळ लागू शकतो," डॅगविट मोगेस पत्रकारांशी बोलत होते.

Image copyright Reuters

ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे त्यांच्या नातेवाईकांना DNAचे नमुन देण्यास सांगण्यात येत आहे. इओथोपियन एअरलाईन्सच्या कार्यालयात किंवा अडिस अबाबा येथे हे नमुन देण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

येत्या दोन आठड्यात मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांचा प्रतीकात्मक दफनविधी करण्यासाठी एक किलो माती देण्यात आली आहे. रविवारच्या प्रार्थनेचा भाग म्हणून इथोओपियाच्या राजधानीत हे पाऊल उचलण्यात आल्याची बातमी AP या वृत्तसंस्थेने दिली आहे.

"मृतदेह देण अशक्य होतं. त्याऐवजी माती पाठवण्यात आली," असं एका मृताच्या नातेवाईकाने सांगितलं. "आमच्या नातेवाईकांचे मृतदेह मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही," असंही ते पुढे म्हणाले.

दुर्घटनाग्रस्त विमानात 30पेक्षा अधिक देशांचे प्रवासी होते. या अपघाताची चौकशी करण्यासाठी अमेरिका आणि फ्रान्सच्या टीम्सलाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

अपघात झाल्यावर या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. त्यामुळे या दुर्घटनेबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)