जो कॅमरून यांना कुठल्याच वेदना का बरं होत नाहीत?

वेदना Image copyright Petr jolly/Shutterstock

जो कॅमरून या स्त्रीला वेदनाच होत नाहीत. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर जेव्हा एखादा भाजलेला माशाचा त्या वास घेतात तेव्हा त्यांची त्वचा किंचित भाजल्यासारखी वाटते. अनेकदा त्यांचा हात ओव्हनवर भाजतो, मात्र त्यांना कोणत्याही वेदना होत नाहीत.

याचं कारण असं आहे की त्यांना जनुकांशी निगडीत अत्यंत दुर्मीळ आजार झाला आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांना अजिबात वेदना होत नाहीत. त्यांना कधीच भीती वाटत नाही किंवा अस्वस्थ वाटत नाही.

वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्याबरोबर काहीतरी वेगळं होतंय हे त्यांना जाणवलं नाही. एका गंभीर शस्त्रक्रियेनंतर जेव्हा त्यांना वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागल्या नाहीत तेव्हा डॉक्टरही आश्चर्यचकित झाले.

त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना वेदना होईल असा इशारा दिला होता.

जेव्हा त्यांना काहीच वेदना झाल्या नाहीत तेव्हा त्यांचे भूलतज्ज्ञ- डॉ.देवजित श्रीवास्तव यांनी त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनला वेदनेशी निगडीत एका जनुकीय तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला.

चाचण्या झाल्यानंतर जनुकीय परिवर्तनामुळे त्यांना सामान्य व्यक्तींसारख्या वेदना होत नाहीत असं लक्षात आलं.

''...फक्त आरोग्यदायी नाही''

शस्त्रक्रिया झाल्यानंतर वेदनाशामक गोळ्या लागणार नाहीत असं जेव्हा त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा डॉक्टरांचा विश्वास बसला नाही असं जो यांनी बीबीसी स्कॉटलंडला सांगितलं.

त्या सांगतात, "मला वेदनाशामक गोळ्या लागणार नाही असं जेव्हा मी सांगितलं तेव्हा माझी थट्टाही केली."

"जेव्हा मी खरंच मागितल्या नाहीत तेव्हा त्यांनी माझा वैद्यकीय पूर्वैइतिहास तपासला आणि त्यांना लक्षात आलं की मी या गोळ्या कधीच घेतलेल्या नाहीत."

Image copyright Jo cameron

त्यानंतर इंग्लंड येथील विशेषज्ञांकडे जो यांना पाठवण्यात आलं. जेव्हा या रोगाचं निदान झालं तेव्हा त्यांन कळलं की वेदना न होणं फारसं आरोग्यदायी नाही.

त्या सांगतात, "मागे वळून पाहताना मला वाटतं की मला वेदनाशामक गोळ्या लागल्या नाहीत. जर तुम्हाला त्याची गरज नसेल तर तुम्ही विचारायला हवंत की असं का होतं ते?"

"जोपर्यंत कुणी प्रश्न उपस्थित करत नाही तेव्हापर्यंत आपण जसे असतो तसं आपण स्वत:ला स्वीकारलेलं असतं. माझ्याबरोबर काहीतरी वेगळं होतंय हे मला कधी जाणवलंच नाही."

बाळंतपणातही त्यांना काहीच वेदना झाल्या नाहीत. "ते सगळं विचित्र होतं. पण मला काही वेदना झाल्या नाही. ते सगळं फार आनंददायी होतं खरंतर."

जो यांनी काहीच बदल केला नाही. पण त्यांच्या मते "वेदना महत्त्वाची आहे. त्यामुळे शरीराला धोक्याची सूचना मिळते."

जेव्हा काहीतरी चुकीचं होतं तेव्हा असा इशारा मिळणं अतिशय आवश्यक असतं. जेव्हा माझी कंबर निकामी झाली तेव्हा मला त्याची जाणीवच झाली नाही. मी चालू शकले नाही तेव्हा मला उपरती झाली.

Image copyright JO cameron

"त्याला सुखकारक जनुकं किंवा विसराळू जनुकं असं म्हणतात. मी आनंदी आणि क्षमाशील राहून लोकांना जळवलं. आता तर काय मला कारणच मिळालंय." त्या पुढे सांगतात.

या जनुकांची काही मदत होईल का?

काही दिवसांपूर्वी जो यांच्या कारला छोटासा अपघात झाला. मात्र त्या अजिबात विचलित झाल्या नाहीत. इतरांना हा अनुभव वेदनादायी वाटला असता. मला अड्रिनॅलिनचा अनुभवच नाही. तुम्हाला तरी तो इशारा मिळतो. हे जिवंत असण्याचं लक्षण आहे. तरी मी हे काहीही बदलणार नाही.

''दुसरी गोष्ट म्हणजे भीती. मला अजिबात भीती वाटत नाही. हा अहंकार नाही.'' असंही जो सांगात. संशोधकांच्या मते हे शक्य आहे आणि जो सारखे अनेक लोक आहेत.

"शस्त्रक्रियेनंतर दोनपैकी एका व्यक्तीला वेदना होतातच. वेदनाशामक औषधांमध्ये बरंच नवीन तंत्रज्ञान आलं आहे तरीही. त्यामुळे आमच्या संशोधनाच्या आधारावर काही नवीन उपचारपद्धती तयार होईल का याची आम्ही चाचपणी करतोय." डॉ.श्रीवास्तव सांगतात.

"शस्त्रक्रियेनंतर कमीत कमी वेदना होणं आणि जखमा बऱ्या होणं या दोन गोष्टींवर आमचा भर राहील. आमच्या या संशोधनामुळे दरवर्षी शस्त्रक्रियेला सामोरे जाणाऱ्या 33 कोटी लोकांना याचा फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे."

डॉ. श्रीवास्तव आमणि डॉ. जेम्स कॉक्स यांनी एक शोधनिबंध सादर केला आहे. तो जो यांच्यावरच आधारित आहे.

डॉ कॉक्स म्हणतात, "ज्या लोकांना वेदना जाणवत नाही त्यांचा वैद्यकीय संशोधनात फायदा होऊ शकतो. कारण त्यामुळे आम्हाला जनुकीय परिवर्तन शिकायला मदत होते. त्यामुळे ज्यांना वेदना होत नाही असे लोक पुढे येतील."

"आमच्या या संशोधनामुळे आमचं संशोधन शस्त्रक्रियेनंतरची वेदना, अस्वस्थता, दीर्घकालीन वेदना आणि जखमा बऱ्या होणं यासाठी उपयुक्त ठरेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)