'ज्युलियन असांज यांनी इक्वेडोरच्या दूतावासातून हेरगिरी केली'

असांज Image copyright Getty Images

ज्युलियन असांज यांनी हेरगिरी करण्यासाठी इक्वेडोर या देशाच्या लंडनमधील दूतावासाचा वापर केला होता, अशी माहिती इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी दिली आहे.

लेनिन मोरेनो यांनी गार्डियन या वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली. "असांज यांना दिलेला आश्रय रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही नेत्याने प्रभाव टाकलेला नाही. असांज यांनी नियमांचा भंग केल्याने हा निर्णय घेण्यात आला."

इक्वेडोरच्या पूर्वीच्या सरकारने असांज यांनी इतर देशांत ढवळाढवळ करण्यासाठी दूतावासात साधनं उपलब्ध करून दिली, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र लेनिन मोरेनो 2017ला सत्तेत आले.

इक्वाडोरने असांज यांना 7 वर्षं दूतावासातात आश्रय देण्याचा निर्णय मागे घेतला. त्याबद्दल ते बोलत होते. आम्ही सार्वभौम राष्ट्र आहोत, इतर देशांचं राजकारणाबद्दल आम्ही संवेदनशील आहोत, असं ते म्हणाले.

असांज यांच्या वकील जेनिफर रॉबिन्सन यांनी इक्वेडोरची कारवाई आततायी असल्याचं म्हटलं होतं. "इक्वेडोरने ज्या प्रकारे ब्रिटिश पोलिसांना दूतावासात येऊ दिलं ते बेकायदेशीर होतं."

असांज यांचं प्रत्यार्पण अमेरिकेकडं केलं जाईल, अशी भीती वाटते. ही भीती सत्यात येऊ शकेल, असं त्या म्हणाल्या. अमेरिकेने गेल्याच आठवड्यात असांज यांनी पेटांगॉनचं कॉम्प्युटर हॅक करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता.

असांज 2012मध्ये इक्वाडोरच्या दूतावासात आले. त्यांनी जर नियमभंग केल्याचं सिद्ध झालं तर त्यांना 12 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

स्वीडनमध्ये असांज यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. त्यांचं प्रत्यार्पण स्वीडनकडे केलं जावं असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)