समुद्रात दूरवर अडकलेल्या कुत्र्याचा जीव असा वाचला

समुद्रात अडकलेलं कुत्रं Image copyright VIRALPRESS

थायलंडमध्ये तेल उपसा यंत्रणेवर काम करणाऱ्या कामगारांनी किनाऱ्यापासून 220 किलोमीटर लांब अडकलेल्या एका कुत्र्याची सुटका केली. थकून गेलेलं हे कुत्रं तेलविहिरीच्या पाइपलाईन जवळच पाय मारत होतं.

कामगारांनी आवाज दिल्यानंतर तपकिरी रंगाचं कुत्रं लगेचच त्यांच्या दिशेनं आलं. कामगारांनी त्याला सुरक्षितपणे जहाजावर खेचून घेतलं.

हे कुत्रं समुद्रात एवढ्या लांबपर्यंत पोहोचलं कसं हे अजून कळलं नाही. हे कुत्रं मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ट्रॉलरमधून पडलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Image copyright VIRALPRESS

कामगारांनी या कुत्र्याचं नाव प्रेमानं बूनरोड ठेवलं आहे. हा थाई भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ 'संकटातून वाचलेला' असा आहे.

Image copyright VIRALPRESS

या जहाजावर त्याची पुरेशी बडदास्त ठेवण्यात आली. त्यानंतर त्याला परत पाठविण्यासाठी किनाऱ्यावर जाणाऱ्या एका टँकरची मदत घेण्यात आली.

Image copyright VIRALPRESS
Image copyright VIRALPRESS

बूनरोडच्या मऊ केसांमध्ये समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळं मीठ जमलं होतं. त्यामुळे त्याला काळजीपूर्वक अंघोळ घालावी लागली. खाण-पिणं आणि अंघोळीनंतर त्यानं निवांत झोप काढली.

Image copyright VIRALPRESS

बूनरोडची सुटका केली तेव्हा समुद्रही शांत होता. त्यामुळेच लोखंडी खांबांमधून त्याला नीट बाहेर काढणं सोपं गेलं.

Image copyright VIRALPRESS

बूनरोडला तेलाच्या बॅरलसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी क्रेनच्या सहाय्यानं वर काढण्यात आलं. रविवारी त्याला दक्षिण थायलंडमधील प्राण्यांच्या डॉक्टरकडे पाठवलं.

Image copyright VIRALPRESS

जमिनीवर आल्यानंतर बूनरोड एकदम खूश झाला होता.

Image copyright VIRALPRESS
Image copyright VIRALPRESS

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)