ऑस्ट्रेलियात एका हरणाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू, एक महिला गंभीर जखमी

हरिण

ऑस्ट्रेलियात ग्रामीण भागात हरणाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि एका महिला गंभीर जखमी झाली आहे. या भागात हरणांतर्फे होणारे हल्ले दुर्मिळ आहेत.

व्हिक्टोरिया नावाच्या राज्यात हरणाने बुधवारी सकाळी हल्ला केला असं पोलिसांनी सांगितलं. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

2000 ते 2013 या काळात हरणाच्या हल्ल्याने मृत पावल्याची एकही घटना घडलेली नाही असं एका सर्वेक्षणात आढळून आल्याचं लेखक रॉनेल वेल्टन यांनी सांगितलं.

मेलबर्नच्या ईशान्य भागातील वनगरट्टा भागात हरणाला बेशुद्ध केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हरणांमुळे होणाऱ्या हल्ल्यांचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे असा अहवाल मागच्या वर्षी सादर करण्यात आला होता. पोलिसांना या हरणाच्या प्रजातीचा शोध लागलेला नाही. या भागात सांबर, रेड आणि हॉग हरिण या प्रजाती तिथे सापडतात.

राष्ट्रीय उद्यानात जे हरणं ऑस्ट्रेलियाचे नाही त्यांचं धोकादायक प्रजातीत वर्गीकरण करण्यात येतं. ऑस्ट्रेलियाच्या या भागात एखाद्या हरणाने हल्ला केल्याचं ऐकिवात नाही असं वेल्टन यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)