भारतातील दुष्काळाच्या हृदयद्रावक फोटोंना मिळालं सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अवार्ड

यंदाचे Sony World Photography Award जाहीर झाले आहेत. फेड्रिको बोरेला यांनी Photographer of the Year पुरस्कार पटकावला आहे. तामिळनाडूनातल्या शेतकऱ्यांची गंभीर स्थिती त्यांनी फोटोंच्या माध्यमातून मांडली आहे.

तामिळनाडूमधले शेतकरी करपुले Image copyright Federico Borella
प्रतिमा मथळा तामिळनाडूमधले शेतकरी करपुले

हे आहेत करपुले. तामिळनाडूमध्ये आधी शेती करणारे करपुले आता बांधकाम मजूर म्हणून काम करतात. त्यांना दिवसाला 400 रुपये मजुरी मिळते.

मल्लिका तामिळनाडूच्या लालगुढी गावात त्या शेतात उभ्या आहेत, जिथे त्यांच्या पतीने जानेवारी 2017 मध्ये आत्महत्या केली. Image copyright Federico Borella
प्रतिमा मथळा मल्लिका तामिळनाडूच्या लालगुढी गावात त्या शेतात उभ्या आहेत, जिथे त्यांच्या पतीने जानेवारी 2017 मध्ये आत्महत्या केली.

Five Degrees या प्रोजेक्टसाठी डॉक्युमेंटरी प्रवर्गाअंतर्गत बोरेला यांना पुरस्कार मिळाला आहे.

आपल्या कलाकृतीतून त्यांनी एक प्रश्न विचारला आहे - भारतीय शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येचं कारण हवामान बदल आणि वाढत्या तापमानाशी निगडित आहे का?

बोरेला यांनी आपलं काम तामिळनाडूमध्ये केलं आहे. या राज्यानं गेल्या 140 वर्षांतील सर्वांत विदारक दुष्काळ 2016-17मध्ये अनुभवला.

निवड समितीचे प्रमुख माईक ट्रो म्हणाले की, "बोरेला यांनी अत्यंत संवेदनशील आणि कल्पकतेनं हे फोटो टिपले आहेत. त्यांच्या कामामधले भाव आम्हाला सर्वांना सारखेच आवडले."

"या चित्रीकरणातील पोट्रेटची स्थिरता, लँडस्केपची स्पष्टता आणि प्रतिमांचा साधेपणा, या माध्यमातून चित्रीकरणात संतुलन साधण्यात आलं आहे. त्यांच्या चित्रीकरणात कोणत्याही पद्धतीचा भडकपणा नाही, पण त्यातून त्यांनी बरंच काही सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे," असंही त्यांनी म्हटलंय.

पुरस्कार जिंकणाऱ्या इतर फोटोंमध्ये सार्वजनिक जीवन, राजकीय घडामोडी आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीशी संबंधित फोटोंचा समावेश आहे.

जर्मनी Image copyright Stephan Zirwes
प्रतिमा मथळा जर्मनीतील सार्वजनिक तरण तलावांसंदर्भात वास्तूरचना प्रकारात स्टीफन झिर्व्हस यांनी पुरस्कार पटकावला.

स्टीफवन झिर्व्हस यांना Architecture या प्रवर्गाअंतर्गत प्रथम पारितोषिक मिळालं. हा पुरस्कार त्यांना जर्मनीतल्या पोहण्याच्या सार्वजनिक तलावांच्या चित्रीकरणामुळे मिळाला.

खेळ Image copyright Alessandro Grassani
प्रतिमा मथळा Sport प्रकारात पहिला क्रमांक अलेक्झांड्रो ग्रास्सानी यांच्या Boxing Against Violence सीरीजिनं पटकावला आहे. गोमातल्या महिला बॉक्सरवर ही सीरिज आधारित आहे.

हा 16 वर्षीय ईस्टरचा फोटो आहे. ती बॉक्सर आहे. गोमातल्या रस्त्यावर हा फोटो घेण्यात आला आहे. देशातल्या दोन अधिकृत बॉक्सिंग क्लबपैकी एक असलेल्या Virunga क्लबची ती सदस्य आहे.

Presentational white space
सर्जनशील Image copyright Marinka Masséus
प्रतिमा मथळा Marinka Masséus यांच्या सीरिजला Creative या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Marinka Masséus यांच्या सीरिजला Creative या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी प्रोजेक्ट Radical Beautyचा ही सीरिज एक भाग आहे. व्हिज्युअल आर्टमध्ये Down syndrome असलेल्या लोकांना सहभागी करून घेणं, या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश आहे.

Presentational white space
लग्नसोहळा Image copyright Caimi / Piccinni
प्रतिमा मथळा व्हॅलेंटिना पिक्किनी आणि जीन मार्क कैमी यांचा हा फोटो

व्हॅलेंटिना पिक्किनी आणि जीन-मार्क कैमी नी 2013पासून इंटिमेट फोटोग्राफीसाठी फोटो जुळवायला सुरुवात केली. Güle Güle या प्रोजेक्टसाठी त्यांना Discovery या प्रकारात प्रथम क्रमांक मिळाला. यामध्ये त्यांनी इस्तंबुल शहराचे फोटो काढले आहेत.

Presentational white space
चीन Image copyright Yan Wang Preston
प्रतिमा मथळा यान वांग प्रिस्टन यांनी लँडस्केप विभागात पहिला क्रमांक पटकावला.

यान वांग प्रिस्टन यांनी Landscape प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. चीनच्या यूनान प्रांतात ecology recovery या नावाची सीरिज त्यांनी शूट केली.

वन्यप्राणी Image copyright Jasper Doest
प्रतिमा मथळा वन्यजीव प्रकारासाठीचा पुरस्कार यास्पर डोएस्ट यांनी जिंकला.

Natural World & Wildlifeवर यास्पर डोएस्ट यांनी नाव कोरलं. त्यांचा प्रोजेक्ट Bobवर केंद्रित होता. Bob हा कॅरेबियन फ्लेमिंगो आहे. हॉटेलच्या खिडकीत जाताना बॉबच्या जीवनात नाट्यमय वळण आले आणि त्याचा गंभीरपणे गोंधळ झाला. त्याची ओडेट डोएस्ट यांनी काळजी घेतली. डोएस्ट एक स्थानिक पशुवैद्यक आहेत, जे वन्यजीव पुनर्वसन केंद्र आणि संरक्षण संस्था चालवतात. 

अल्वारो लईझ यांना पुरस्कार मिळाला. Image copyright Álvaro Laiz
प्रतिमा मथळा अल्वारो लईझ यांना पुरस्कार मिळाला.

The Chukchiच्या सदस्यांच्या फोटोसाठी Portraiture prize हा पुरस्कार Álvaro Laiz यांना मिळाला आहे. या सीरिजमध्ये The Chukchiच्या ब्लॅक आणि व्हाईट फोटोंचा समावेश आहे. Chukchi हा समुदाय रशियाच्या बेरिंग स्ट्रेट भागात वास्तव्यास आहे.

Presentational white space
लिपस्टिक Image copyright Nicolas Gaspardel
प्रतिमा मथळा निकोलस गस्पार्डेल आणि पॉलिन बर्ट यांना स्टील लाईफ प्रकारासाठी पुरस्कार मिळाला.

निकोलस गस्पार्डेल आणि पॉलिन बर्ट यांना Still Life प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्यांच्या प्रोजेक्टचं नाव Yuck असं आहे.

बेलिजियम Image copyright Rebecca Fertinel
प्रतिमा मथळा रेबिका फर्टिनल या फोटोसाठी विजयी ठरल्या.

Ubuntu - I Am Because We Are यासाठी Brief प्रकारात रेबिका फर्टिनल यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. त्यांचा हा प्रोजेक्ट बेल्जियमधल्या Congolese समुदायाच्या आयुष्यावर प्रकाश टाकतो.

सर्व फोटो 2019 Sony World Photography Awards यांच्या सौजन्याने.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)