World Earth Day : लंडनमध्ये हवामान बदलाविरोधात आंदोलन ; 900 जण अटकेत

लंडन आंदोलनात सहभागी माहिला

फोटो स्रोत, Getty Images

'तुम्ही जे करत आहात ते बदल घडवणारं आहे.'

स्वीडनमधील ख्यातनाम पर्यावरवणवादी कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गन लंडनमध्ये भाषणात बोलत होती. फक्त 16 वर्षांची ग्रेटा हवामान बदलाविरोधात जगभरात सुरू असलेल्या आंदोलनांसाठी प्रेरणा ठरत आहे. या आंदोलनात रविवारी 963 लोकांना अटक करण्यात आली आहे.

लंडनमध्येही गेली काही दिवस हवामान बदलाविरोधात मोठी चळवळ सुरू आहे. Extinction Rebellion नावाने हा 'विद्रोह' सुरू आहे. जैवविविधतेचा होणार ऱ्हास थांबवावा, मनुष्य प्रजाती विलुप्त होण्यापासून वाचवली जावी, जैवविवधता नष्ट कोलमडून मोडण्यापासून वाचवली जावी, अशा मागण्या घेऊन हे अहिंसक पद्धतीने आंदोलन सुरू आहे. राज्यकर्त्यांनी हवामान बदलाचं सत्य सांगावं, कार्बनचं उत्सर्जन 2025पर्यंत शून्य व्हावं, यावर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांची समिती असावी, अशा मागण्यांसाठी आंदोलक करत आहेत. या आंदोलकांनी विविध पुलांवर चक्का जाम आंदोलन केलं होतं शिवाय डाऊनिंग स्ट्रीटवर खोट रक्त ओतलं होतं. शिवाय त्यांनी संसदेत अर्ध नग्न होऊन निदर्शनं केली होती.

आंदोलकांनी आता एक आठवड्याचा कार्यक्रम जाहीर केला असून खासदारांना संसदेत जाण्यापासून रोखलं जाणार आहे.

रविवारी मार्बल आर्च इथं जमलेल्या आंदोलकांसमोर ग्रेटाने भाषण केलं. या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. ती म्हणाली, "राजकारणी आणि जे लोक सत्तेत आहेत त्यांनी हवामान बदलाचं संकट आणि पर्यावरणाचं संकट याच्याशी लढण्यासाठी काहीही केलेलं नाही. आपण आता हे चालणार नाही, याची खबरदारी आपण घेऊ."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ग्रेटाने या आंदोलनात भाग घेतला.

या आंदोलनात आतापर्यंत 963 जणांना अटक झाली आहे. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणे, महामार्ग रोखणे यासाठीचे गुन्हे त्यांच्यावर नोंद करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेले 19 ते 77 वयोगटातील आहेत.

या चळवळीच्या सदस्यांनी लंडनच्या महापौरांसोबत चर्चा करू असं म्हटलं आहे. आंदोलनाची पुढील दिशा आज दुपारी ठरणार आहे.

दिवसाभरात मार्बल आर्च इथं शेकडो लोक जमल्याचे बीबीसी न्यूजचे प्रतिनिधी डॅन कोल्स यांनी सांगितलं. तर ग्रेटाचं भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या लोकांची संख्या याहूनही जास्त होती. ग्रेटा दोन दिवस लंडनमध्ये रेल्वेने प्रवास करणार आहे.

या चळवळीच्या सदस्य फरहाना यामिन म्हणतात राजकीय ध्येय करण्याचा चळवळीचा टप्पा आला आहे. आमची चळवळ सुसंघटित आहे आणि दखल घेण्याइतकी राजकीय शक्ती म्हणून आम्ही पुढं आलो आहोत. फरहान यांनी आंदोलन स्थगित करण्याचा प्रस्ताव असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरे सदस्य लार्क मायर यांनी आंदोलन थांबणार नसल्याचं सांगितलं.

फोटो स्रोत, AFP

पोलिसांनी आंदोलक मार्बल आर्च परिसरात राहतील अशी खबरदारी घेतली आहे. पण अनेक आंदोलकांनी शहरातील विविध भागात रास्ता रोको केला.

शहरात 9000 पोलीस तैनात करण्यात आले असल्याचे महापौर सादिक खान यांनी सांगितलं. याचा शहरातील गुन्हे नियंत्रणावर परिणाम होईल, अशी काळजी त्यांनी व्यक्त केली.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)