अशी आहे युरोपियन युनियनच्या पार्लमेंटची रचना आणि निवडणूक

युरोपियन युनियन निवडणूक Image copyright Getty Images

23 ते 26 मे या काळात युरोपियन पार्लमेंटच्या 700 सदस्यांसाठी निवडणूक झाली. युरोपियन पार्लमेंट ही निवडणूक होणारी युरोपियन युनियनची एकमेव संस्था आहे.

निवडणुकीला सामोरे जाणारे सदस्य एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे प्रतिनिधित्व करू शकतात किंवा ते अपक्ष निवडणूक लढवू शकतात. निवडून आल्यावर ते सर्व त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्व युरोपियन पार्लमेंटमध्ये करतात.

या संसदेसाठी निवडले गेलेले सदस्य युरोपियन युनियनच्या संसदेतील मोठ्या राजकीय गटांमध्ये सामिल होतात. मावळत्या संसदेमध्ये एकूण 751 सदस्य होते. त्यामध्ये 8 राजकीय गट होते.

त्यातील युरोपियन पिपल्स पार्टी (EPP) सर्वांत मोठी होती. त्या गटाकडे 217 सदस्य होते. त्यानंतर सेंटर-लेफ्ट विचारसरणीची सोशालिस्ट्स अँड डेमोक्रॅटसचा (S&D) नंबर लागत होता. त्या गटाकडे 186 जागा होत्या.

त्यानंतर युरोपियन कॉन्झर्वेटिवज (ECR) कडे 76 जागा, लिबरल्स (ALDE - 68 seats), डावे गट (GUE/NGL - 52), ग्रीन (52), दोन नॅशनलिस्ट, युरोसेंट्रिक गट (78), अपक्ष (21) अशी सदस्यसंख्या होती.

Image copyright Getty Images

सदस्य राष्ट्रांच्या मंत्र्यांसोबत काम करणं आणि कायदे करणं हे युरोपियन संसदेचं प्रमुख काम आहे. या मंत्र्यांच्या गटाला काउंसिल असं म्हटलं जातं.

एखाद्या कायद्याला 55 टक्के सदस्यांची मतं मिळाली तर त्याला काउंसिल मंजूर करतं. (55 टक्के म्हणजे 28 सदस्यांपैकी 16 देश आणि युरोपची 65 टक्के लोकसंख्या)

युरोपियन युनियनच्या कायद्यांची निर्मिती आणि अंमलबजावणी करणाऱ्या युरोपियन कमिशनच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही या संदसेच्या सदस्यांकडे असते.

या निवडणुकीतून युनायटेड किंग्डम बाहेर पडले आहे का?

युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी युनायटेड किंग्डमने 2016 साली मतदान घेतले. 29 मार्च 2019 रोजी त्या देशाने संघटनेतून बाहेर पडणं अपेक्षित होतं. मात्र युनायटेड किंग्डमच्या राजकीय नेत्यांमध्ये अजूनही एक्झिट करारावर एकमत झालेलं नाही.

त्यामुळे युनायटेड किंग्डमला या निवडणुकीत सहभागी होणं कायद्यानुसार बंधनकारक आहे.

मग युरोप कोण जिंकणार?

गेल्या काही वर्षांमध्ये युरोपियन युनियनवरोधातील राजकारण्यांचा दबदबा वाढत आहे. अर्थात त्यांना नव्या संसदेत बहुमत मिळण्याची शक्यता नसली तरी त्यांच्या सदस्य संख्येत वाढ होण्याची संख्या आहे.

युरोपियन युनियनला विरोध करणारे सदस्य साधारणतः राष्ट्रवादी किंवा लोकप्रिय पक्षांचे असतात.

युरोपियन युनियनच्या बाजूने असणाऱ्या पक्षांना ही संस्था पर्यावरण, अपारंपरिक ऊर्जा, कामगार हक्क, आर्थिक स्थैर्य, दहशतवादाविरोधात लढणे अशा प्रश्नांमध्ये महत्त्वाची भूमिका घेते असे वाटते.

अमेरिका आणि चीनमधील आर्थिक तणावामुळे झालेल्या गोंधळाच्या काळात युरोपने एकत्रित प्रयत्न केले पाहिजे असं त्यांचं मत आहे.

युनियनच्या बाहेरील देशांमधून 2015-16 या कालावधीत युरोपात झालेल्या स्थलांतरामुळे युरोपातील मतदारांमध्ये मतदानाचं महत्त्व वाढलं आहे.

जर्मनी, हंगेरी, पोलंडसारख्या देशांमध्ये राष्ट्रवादी विचारांच्या लोकांकडून या स्थलांतरावर प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली होती.

Image copyright Getty Images

हवामान बदलासारख्या विषयावर अधिक ताकदीने काम व्हावे असं अनेक मतदारांचं मत आहे.

कोणत्या देशांवर असेल लक्ष?

ब्रेक्झिटबरोबर स्थलांतराच्या मुद्द्याचा अनेक देशांमधील मतदानावर परिणाम दिसून येईल. यामध्ये इटलीचाही समावेश आहे. इटलीमध्ये राष्ट्रवादी, लोकप्रिय पक्षाच्या आघाडीचे सरकार आहे.

त्यामध्ये मॅटिओ साल्विनी यांचा उजव्या विचारसरणीचा पक्ष आणि स्थलांतरविरोधी पक्षांची आघाडी आणि फाइव्ह स्टार यांचा समावेश आहे.

यातील स्थलांतरविरोधी आघाडीने जर्मनीतील अल्टरनेटीव्ह फॉर जर्मनी (एएफडी) आणि डॅविश पिपल्स पार्टीशी हातमिळवणी केली आहे.

त्याबरोबरच फ्रान्सवरही विशेष लक्ष असेल कारण यलो वेस्ट आंदोलनानंतरची युरोपातील ही पहिली निवडणूक आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)