क्रिकेट वर्ल्डकप मधील विक्रमी कामगिरींबद्दल या गोष्टी जाणून घ्या

वर्ल्डकप Image copyright ICC
प्रतिमा मथळा वर्ल्डकप 2019 मध्ये सहभागी झालेल्या संघांचे कर्णधार

क्रिकेट वर्ल्डकप 2019 अवघ्या काही तासांवर आला आहे. वर्ल्डकप म्हटलं की विक्रम ओघाने आलेच. वर्ल्डकपदरम्यान रचल्या गेलेल्या विक्रमांचा घेतलेला आढावा.

सर्वाधिक रन्स

वर्ल्कपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिनने 1992, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 अशा सहा वर्ल्डकपमध्ये खेळताना धावांचा विक्रम रचला. आजही हा विक्रम अबाधित आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
बॅट्समन मॅचेस रन्स सरासरी शतकं अर्धशतकं
सचिन तेंडुलकर 45 2278 56.95 6 15
रिकी पॉन्टिंग 46 1743 45.86 5 6
कुमार संगकारा 37 1532 56.74 5 7

सर्वाधिक विकेट्स

ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा या यादीत अव्वलस्थानी आहे. 'विकेट टू विकेट' गोलंदाजीसाठी मॅकग्रा प्रसिद्ध होता. धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्या मॅकग्राने वर्षानुवर्षे यशस्वीपणे सांभाळल्या.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे.
बॉलर मॅचेस विकेट्स सरासरी इकॉनॉमी सर्वोत्तम प्रदर्शन
ग्लेन मॅकग्रा 39 71 18.19 3.96 7/15
मुथय्या मुरलीधरन 40 68 19.63 3.88 4/19
वसिम अक्रम 38 55 23.83 4.04 5/28

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सहभागी संघांची आतापर्यंतची कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत पाचवेळा वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. याची प्रचिती त्यांच्या कामगिरीतून येते. ऑस्ट्रेलियाचं विजयी होण्याचं प्रमाण 75 टक्के म्हणजे डिस्क्टिंशनसारखं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधली कामगिरी अचंबित करणारी आहे.
संघ मॅचेस विजय हार टाय परिणाम नाही विजयाचं प्रमाण
अफगाणिस्तान 6 1 5 0 0 16.66
ऑस्ट्रेलिया 84 62 20 1 1 75.30
बांगलादेश 32 11 20 0 1 35.48
इंग्लंड 72 41 29 1 1 58.45
भारत 75 46 27 1 1 62.83
न्यूझीलंड 79 48 30 0 1 61.53
पाकिस्तान 71 40 29 0 2 57.97
दक्षिण आफ्रिका 55 35 18 2 0 65.45
श्रीलंका 73 35 35 1 2 50.00
वेस्ट इंडिज 71 41 29 0 1 58.57

सर्वाधिक धावसंख्या आणि नीचांकी धावसंख्या

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्या मर्यादित अनुभवाचा फायदा उठवत चारशेची वेस ओलांडली होती. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

संघ धावसंख्या प्रतिस्पर्धी ठिकाण तारीख
ऑस्ट्रेलिया 417/6 अफगाणिस्तान पर्थ 4 मार्च 2015
भारत 413/5 बर्म्युडा पोर्ट ऑफ स्पेन 19 मार्च 2007
दक्षिण आफ्रिका 411/4 आयर्लंड कॅनबेरा 3 मार्च 2015
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा श्रीलंकेने कॅनडाचा 36 धावांत खुर्दा उडवला होता.

कॅनडाच्या नवखेपणाचा फायदा उठवत श्रीलंकेने त्यांचा 36 धावांत खुर्दा उडवला होता.

संघ धावसंख्या प्रतिस्पर्धी ठिकाण तारीख
कॅनडा 36 श्रीलंका पार्ल 19 फेब्रुवारी 2003
कॅनडा 45 इंग्लंड मँचेस्टर 13 जून 1979
नामिबिया 45 ऑस्ट्रेलिया पॉचस्टेफरुम 27 फेब्रुवारी 2003

इनिंग्जमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन

बॉलर प्रदर्शन संघ प्रतिस्पर्धी ठिकाण तारीख
ग्लेन मॅकग्रा 7-4-15-7 ऑस्ट्रेलिया नामिबिया पोचस्ट्रेफरुम 27 फेब्रुवारी 2003
अँडी बिकल 10-0-20-7 ऑस्ट्रेलिया इंग्लंड पोर्ट एलिझाबेथ 2 मार्च 2003
टीम साऊदी 9-0-33-7 न्यूझीलंड इंग्लंड वेलिंग्टन 20 फेब्रुवारी 2015
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ग्लेन मॅकग्राने नामिबियाला सळो की पळो करून सोडलं.

सर्वाधिक शतकं

बॅट्समन शतकांची संख्या संघ
सचिन तेंडुलकर 6 भारत
कुमार संगकारा 5 श्रीलंका
रिकी पॉन्टिंग 5 ऑस्ट्रेलिया
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिन तेंडुकरच्या नावावर आहे.

भागीदारीचे विक्रम (विकेट्सच्या क्रमाने)

विकेट धावा जोडी संघ प्रतिस्पर्धी ठिकाण तारीख
1 282 थारंगा-दिलशान श्रीलंका झिम्बाब्वे पल्लेकल 10 मार्च 2011
2 372 गेल-सॅम्युअल्स वेस्ट इंडिज झिम्बाब्वे कॅनबेरा 24 फेब्रुवारी 2015
3 237* द्रविड-तेंडुलकर भारत केनिया ब्रिस्टल 23 मे 1999
4 204 क्लार्क-हॉज ऑस्ट्रेलिया नेदरलँड्स बसेटरे 18 मे 2007
5 256* मिलर-ड्युमिनी दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे हॅमिल्टन 15 फेब्रुवारी 2015
6 162 ओब्रायन-क्युसॅक आयर्लंड इंग्लंड बेंगळुरू 2 मार्च 2011
7 107 अन्वर-जावेद युएई आयर्लंड ब्रिस्बेन 25 फेब्रुवारी 2015
7 107 जावेद-अझिझ युएई वेस्ट इंडिज नेपियर 15 मार्च 2015
8 117 हटन-बुचार्ट झिम्बाब्वे न्यूझीलंड हैदराबाद 10 ऑक्टोबर 1987
9 126* कपिल-किरमाणी भारत झिम्माब्वे ट्युनब्रिज वे्ल्स 18 जून 1983
10 71 रॉबर्ट्स-गार्नर वेस्ट इंडिज भारत मँचेस्टर 9 जून 1983
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल्स

वेगवान शतक

वर्ल्डकपमध्ये वेगवान शतक आयर्लंडच्या केव्हिन ओब्रायनच्या नावावर आहे. केव्हिनने 2011 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध 50 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं.

सर्वाधिक षटकार

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम ख्रिस गेल आणि एबी डी'व्हिलियर्स यांच्या नावावर संयुक्तपणे आहे. या दोघांनी वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी 37 षटकार लगावले आहेत. ख्रिस गेल यंदाच्या वर्ल्डकपमध्येही खेळणार असून, षटकारांच्या रकान्यात भर घालण्यासाठी तो उत्सुक आहे. वर्ल्डकपनंतर निवृत्त होणार असल्याचं गेलने जाहीर केलं आहे. षटकारांच्या भरघोस पुंजीसह खेळाला अलविदा करण्याचा गेलचा प्रयत्न असेल.

सर्वाधिक सामने

वर्ल्डकपचे सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार असलेल्या पॉन्टिंगने वर्ल्डकपमध्ये 46 मॅचेस खेळल्या आहेत. सचिन तेंडुलकर 45 सामन्यांसह दुसऱ्या स्थानी आहे.

सर्वाधिक कॅचेस

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक कॅचेस रिकी पॉन्टिंगच्याच नावावर आहेत. त्याने 28 कॅच टिपले आहेत. श्रीलंकेचा कुमार संगकारा कीपिंगच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे. संगकाराने 41 कॅच घेतले आहेत तर 13 बॅट्समनना स्टंपिंग केलं आहे.

यंग अँड ओल्ड

कॅनडाचा नितीश कुमार हा वर्ल्डकपमध्ये खेळणारा सगळ्यात लहान वयाचा खेळाडू आहे. सोळाव्या वर्षी नितीशने वर्ल्डकप पदार्पण केलं होतं. नेदरलँड्सचा नोलन क्लार्क हा वर्ल्डकपमध्ये खेळणारा सगळ्यात वयस्कर खेळाडू आहे. 47 वर्षांचा नोलन 1996 वर्ल्डकपमध्ये खेळला होता.

हे वाचलंत का?

2019 क्रिकेट वर्ल्डकपमधले 10 संघ आणि त्यांचा इतिहास

2019 क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक: भारत-पाकिस्तान कधी आमनेसामने?

वर्ल्डकप ते पॅकअप: चार वर्षात संघाबाहेर झालेल्या 8 खेळाडूंची कहाणी

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)