मालीमध्ये झालेल्या हिंसाचारात डोगन समुदायातले 100 जण ठार

मालीतलं गाव Image copyright Getty Images

पश्मिम अफ्रिकेतल्या माली या देशात हिंसाचार झाला. त्यात किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

सोबाने काऊ या गावात डोगन समूहाच्या लोकांवर हल्ले झाले. या हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांचे मृतदेह जाळून टाकण्यात आल्याचं फ्रेंच वृत्तसंस्था RFIनं सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मालीमध्ये वांशिक संघर्ष वाढला आहे तसेच काही जिहादी समूहाने देखील सामन्यांच्या हत्या केल्याच्या घटना घडत आहेत.

डोगन हंटर्स आणि भटकंती करणारे फुलानी या दोन समूहांमध्ये मालीमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. त्यातून या हत्या झाल्या असाव्यात असा संशय आहे.

या गावापासून जवळच असलेल्या बॅंकास या शहराजे महापौर माउलये गिंडो यांनी सांगितलं की त्याच जिल्ह्यातील फुलानी समुदायातील लोकांनी सोबाने काऊ गावावर हल्ला केला.

आतापर्यंत 95 जणांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. हत्येनंतर त्यांचे मृतदेह जाळले आहेत. इतर लोकांचा शोध सुरू आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

याच भागात काही दिवसांपूर्वी फुलानी समुदायातल्या 130 जणांची हत्या करण्यात आली होती. उत्तर मालीमध्ये 2012पासून दोन गटांत सातत्याने संघर्ष होत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)