रिफ्यूजी महिलांनी उभारला बाहुल्यांचा संसार
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

रिफ्यूजी महिलांनी उभारला बाहुल्यांचा संसार

भरल्या घरातून अचानक उठून अंगावरच्या कपड्यांनिशी घर सोडावं लागलं तर? अशीच काही परिस्थिती अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या गुलजान यांच्यावर आली. 2015 साली त्या अफगाणिस्तानातून निर्वासित म्हणून भारतात आल्या.

आज त्या तीन मुलांसह दिल्लीत राहातात. “सुरुवातीला निर्वासित हा शब्द फक्त बातम्यांमध्ये ऐकला होता. ती परिस्थिती आमच्यावर ओढावेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. इथे आलो तेव्हा काही समस्यांचा सामना करावा लागला. एका खोलीचं घर सोडतानासुद्धा आपल्याला इतका त्रास होतो, आम्ही तर आमचं घरदार, गाडी, बंगला सोडून इथं आलो.”

तरीही गुलजान आता सुंदर सुंदर बाहुल्या बनवतात. त्याच्या सोबत 20 अफगाणी महिला आहेत. या बाहुल्या देशातच नाही तर परदेशातही विकल्या जातात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)