जयपूर आता जागतिक वारसास्थळ: संयुक्त राष्ट्रांची 2019 ची अपडेटेड यादी जाहीर

जयपूर Image copyright Getty Images

संयुक्त राष्ट्रांची निगडित संस्था युनेस्को दरवर्षी नव्या जागतिक वारसास्थळांची यादी अपडेट करत असते. यावर्षीही या यादीत काही नवीन नावं जोडण्यात आली आहेत.

जयपूर शहर

गुलाबी शहर नावाने ओळखल्या जाणाऱ्या जयपूरचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. जयपूर शहरातील काही इमारतींची निर्मिती 1727 मध्ये करण्यात आली होती. तरी आजही या इमारती तितक्याच आकर्षक आहेत.

देश विदेशातल्या पर्यटकांसाठी हे शहर म्हणजे कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

आयर्लंडचा वातानुकूलित राष्ट्रीय पार्क

Image copyright Getty Images

हा ज्वालामुखीय परिसर 14 टक्के भागात पसरला आहे. या पार्कात अनेक हिमशिखरं आहेत तसंच अनेक आकर्षक प्राणीही आहेत. इथे लावा फिल्डस सारखे वेगळ्या प्रकारचे जीवजंतू येथे सापडतात.

फ्रेंच ऑस्ट्रल लँड अँड सीज

ही जागा दक्षिण महासागराच्या अगदी मधोमध आहे. ही जागा म्हणजे लहान बेटांचा समूह आहे. त्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट केलं आहे.

Image copyright Getty Images

इथे मोठ्या प्रमाणात पक्षी आणि जलचर प्राणी आढळतात. त्यात किंग पेग्विंनचाही समावेश आहे.

प्राचीन जपानममधील मकबरा

Image copyright Getty Images

जपानच्या ओसाका प्रांतात 49 मकबरे आहेक. ते तिसऱ्या ते सहाव्या शतकातील आहे. तिथे अनेक प्रकारच्या टेकड्या आहेत. त्यात किल्ली ज्या छिद्रात घालतो त्या छिद्रासारखी दिसणारीही एक टेकडी आहे. या टेकडीचं नाव सम्राट निनटोकूच्या नावावर आहे. हा जपानमधील सगळ्यांत मोठा मकबरा आहे.

इराकमधील बेबीलॉन

Image copyright Reuters

बऱ्याच प्रयत्नानंतर प्राचीन शहर म्हणून ओळख असलेल्या बेबीलॉनला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे.

इराक मध्ये झालेल्या अफरातफरीमुळे या जागेचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र तिथे अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

बगान म्यानमार

Image copyright Getty Images

म्यानमारची ही प्राचीन राजधानी पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. तिथे हजारो बुद्ध मंदिरं आहेक. थोडं दुरवरून पाहिलं तर ही जागा अतिशय सुंदर दिसते.

प्लेन ऑफ जार, लाओस

Image copyright Getty Images

इथे मोठ्या मोठ्या दगडांनी मडकं तयार करण्यात आली आहेत. ही जागा मध्य लाओसमध्ये आहे. पुरातत्त्वशाश्त्रज्ञांच्या मते इथे असलेले मडके लोहयुगातले आहे. त्यांच्या मते याचा वापर अंत्यसंस्कारांसाठी केला जातो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)