प्राणी संग्रहालयात दुर्मीळ प्रजातीच्या पांडाने दिला दोन गोड पिल्लांना जन्म

पांडा Image copyright Reuters
प्रतिमा मथळा प्रचंड आकाराच्या पांडाने दोन जुळ्या पिल्लांना जन्म दिला.

बेल्जियममध्ये एका पांडाने दुर्मीळ जुळ्यांना जन्म दिला. पेअरी डेईझा प्राणी संग्रहालयाने यासंदर्भात घोषणा केली. जुळ्या पांडांची ही जोडी अतिदुर्मीळ असल्याचं संग्रहालयाचं म्हणणं आहे.

नवजात पांडांसाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे आहेत असं संग्रहालयाने स्पष्ट केलं. पिलांपैकी एक नर तर दुसरी मादी आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा पांडाची पिल्लं

आई हाओ-हाओ आणि पिल्लांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल असं संग्रहालयातर्फे सांगण्यात आलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नामशेष होत असलेल्या प्रजातींमध्ये पांडांचा समावेश होतो. पांडाने जुळ्या पिल्लांना दिलेला जन्म ही अतिशय चांगली बातमी आहे असं पेअरी डेईझा संग्रहालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक इरिक डोंब यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लहानग्या पांडाला दूध दिलं जाताना

आम्हाला अभिमान वाटतो. गुरुवारी पांडाने जुळ्या पिल्लांना जन्म दिला. नर पांडाचं वजन 160 ग्रॅम आहे तर मादी पांडाचं वजन 150 ग्रॅम आहे.

या पिल्लांची आई हाओ-हाओ हिला पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी एका पिल्लाला थोडा वेळ इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात येईल. त्यावेळी पिल्लाला बाटलीने दूध देण्यात येईल.

हाओ-हाओ गरोदर असल्याचं एप्रिलमध्ये स्पष्ट झालं होतं. ही पिल्लांची जोडी हाओचं दुसरं आणि तिसरं अपत्य आहे. चीनमधून हाओ पांडाला बेल्जियममध्ये आणण्यात आलं आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा पांडा पिल्लांसह

वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडच्या आकडेवारीनुसार जगात 2,000 पेक्षा कमी पांडा शिल्लक आहेत.

निसर्गाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेने 2016 मध्ये पांडांची स्थिती चिंताजनकहून भयंकर असल्याचं नमूद केलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)