पॉर्नस्टार मिया खलिफा: पॉर्न इंडस्ट्री सोडली पण भूतकाळ पाठ सोडत नाहीये

मिया खलिफा Image copyright Twitter/Mia.k

पॉर्नहबवर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मिया खलिफाने पॉर्न इंड्रस्ट्री सोडली. पण तिच्या भूतकाळामुळे तिला दुसरं काम मिळणं देखील कठीण झालं. पॉर्न इंड्रस्ट्री सोडल्यानंतर तिच्या आयुष्यात काय बदले घडले याविषयी तिने मुलाखत दिली आहे.

प्रसिद्ध पॉर्नस्टार असलेल्या मिया खलिफाने पहिल्यांदा स्वतःच्या करियरविषयी खुलेपणाने बातचीत केली आहे.

मिया खलिफाने मेगन अबोट या अमेरिकी लेखिकेला मुलाखत दिली. या मुलाखतीत मिया खलिफाने पॉर्न बनवणाऱ्या कंपन्या तरुण मुलींना आपल्या जाळ्यात खेचतात, असा आरोप केला आहे.

26 वर्षांच्या मिया खलिफाने केवळ तीन महिने पॉर्न इंडस्ट्रीत काम केलं. 2014च्या मे महिन्यात मिया या इंडस्ट्रीत आली आणि 2015च्या सुरुवातीला त्यांनी हे काम सोडलं. मात्र, ज्यावेळी ती या इंडस्ट्रीतून बाहेर पडली त्यावेळी ती पॉर्नहब नावाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध हिरोईन झाली होती.

आपल्या मुलाखतीत मिया म्हणजे ती अजूनही स्वतःचा भूतकाळ स्वीकारू शकलेली नाही.

तिने ट्वीटवर म्हटलं आहे, "लोकांना वाटतं मी पॉर्न इंडस्ट्रीत कोट्यवधी रुपये कमावते. मात्र, या कामातून मी केवळ 12 हजार डॉलर्स मिळवले आहेत. त्यानंतर मी या कामातून फुटकी कवडी कमावलेली नाही. पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर मला सामान्य नोकरी शोधण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. पॉर्न माझ्यासाठी खूप भयंकर होतं."

मियाने आजवर आपल्या भूतकाळाविषयी बोलणं टाळलं आहे. मात्र, आता आपण आपल्या भूतकाळातल्या त्या प्रत्येक बाबीवर प्रकाश टाकायला तयार आहे असं ती सांगते. ती म्हणते जर तो बिझनेस माझ्या नावावर चालत असेल तर कुणीही त्याचा वापर माझ्या विरोधात करू शकत नाही.

मिया खलिफा सर्वाधिक रेटिंग असलेली पॉर्नस्टार आहे. 'या कामामुळे मला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढा पैसा मिळाला नाही,' असं ती म्हणते.

Image copyright Getty Images

आजही तिच्या नावावर एक वेबसाईट सुरू आहे. ज्यावर लिहिलं आहे की मिया तिची मालकीण नाही आणि यातून तिला पैसेही मिळत नाहीत.

ती म्हणते, "दरम्यानच्या काळात माझी एकच इच्छा होती की काहीही करून त्या वेबसाईटवरून माझं नाव काढलं जावं."

मिया खलिफा लेबनान या एका अरेबिक राष्ट्रात जन्मली. आपल्या करियरविषयी बोलताना या इंडस्ट्रीतून बाहेर पडल्यावर आपल्याला दुसरी नोकरी मिळवण्यात खूप अडचणी आल्याचं तिचं म्हणणं आहे.

ती म्हणते, "माझ्या जुन्या कामामुळे मला नवीन नोकरी मिळायची नाही, तेव्हा मला फार वाईट वाटायचं. मात्र, माझा होणारा नवरा खूप चांगला आहे. मला शोधूनही त्याच्यासारखा मुलगा सापडणार नाही, असं मला वाटतं."

Image copyright Mia k@twitter
प्रतिमा मथळा असा मुलगा शोधूनही मला सापडणार नाही असं मिया सांगते.

या वर्षीच्या सुरुवातीला रॉबर्ट स्टॅंडबर्गशी मियाचा साखरपुडा झाला.

पॉर्न जगतात मियाचं करियर छोटं असलं तरी वादग्रस्त होतं. हिजाब घालून केलेल्या एका पॉर्न शूटवरून बराच वाद उफाळला होता.

या व्हिडियोनंतर आयसिसने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

ती म्हणते, "व्हिडियो रिलीज होताच वाद उफाळला. आयसिसने मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्या लोकांनी गुगल मॅपवरून काढलेले माझ्या घराचे फोटो मला पाठवले."

"मी इतकी घाबरले होते की दोन आठवडे हॉटेलवर राहिले."

इंस्टाग्रामवर मियाचे 17 लाख फॉलोअर्स आहेत. ट्रोल्स त्यांना अनेकदा धमक्या देत असतात.

Image copyright Getty Images

ती म्हणते, "लहान सहान धमक्यांची आता मला भीती वाटत नाही. लोकांच्या बोलण्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटत नाही. पण मला सतत आयसिसची भीती वाटते. कुणीही संशयास्पद दिसलं तर मला वाटतं हे लोक आयसिसचे तर नाहीत ना? हे मला ठार तर करणार नाही ना? असा विचार डोकावतो. पण नंतर भीती निघून गेल्या बरं वाटतं."

मिया खलिफाने आपला पहिला पॉर्न व्हिडियो ऑक्टोबर 2014मध्ये बनवला होता.

लोकांना हे कळावं अशी आपली इच्छा नव्हती, असं तिने मुलाखतीत म्हटलं आहे. तिला ही बाब लपवून ठेवायची होती.

मात्र, ती दोन-तीन महिन्यातच ती पॉर्नहब वेबसाईटची नंबर वन पॉर्नस्टार झाली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)