Quaden Bayles: शाळेतल्या दमदाटीनं दुखावलेला क्वेडन रग्बीच्या मैदानात उतरला

इंडिजनस ऑल स्टार टीम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

इंडिजनस ऑल स्टार टीम

ऑस्ट्रेलियातल्या 9 वर्षीय क्वेडन बेयल्स (Quaden Bayles) या मुलाला आता जगभरातून पाठिंबा वाढताना दिसतोय. आता तर ऑस्ट्रेलियातल्या नॅशनल रग्बी लीगमध्येही क्वेडन मैदानात उतरला होता.

ऑस्ट्रेलियात सध्या नॅशनल रग्बी लीग सुरू आहे. या लीगमधील एका सामन्यात इंडिजनस ऑल स्टार टीमचं नेतृत्व करण्याची संधी क्वेडन बेयल्सला देण्यात आली. माओरी ऑल स्टार्स या संघाविरोधात ऑस्ट्रेलियातल्या ग्लोड कोस्ट इथं खेळवल्या गेलेल्या सामन्यात क्वेडन मैदानात उतरला होता.

क्वेडनला खेळण्यास आमंत्रित करण्यासाठी इंडिजनस ऑल स्टार टीमचा खेळाडू लेट्रेल मिशेलनं खास व्हीडिओ तयार केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

इंडिजनस ऑल स्टार टीमच्या कर्णधाराचा हात पकडून क्वेडन मैदानातही उतरला. त्यावेळी सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत त्याचं स्वागतही केलं.

या सर्व घडामोडींचं वर्ण करताना क्वेडनची आई म्हणाली, "क्वेडन त्याच्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवसातून सर्वात चांगल्या दिवसात गेलाय."

क्वेडनसोबत नेमकं काय झालं होतं?

क्वेडन 9 वर्षांचा आहे. मात्र, त्याला Dwarfism आहे म्हणजे तो ठेंगणा असल्यामुळे शाळेतली इतर मुलं त्याला चिडवतात. या सर्व प्रकाराला क्वेडन कंटाळला होता.

त्यानंतर क्वेडनच्या मनावर या सर्व bullying (दमदाटी) चा काय परिणाम झाला याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय.

क्वेडनची आई याराक्का यांनी क्वेडनला शाळेतून आणल्यावर हा व्हीडिओ शूट करून पोस्ट केला आहे. या व्हीडिओत शाळेत मुलांनी त्याच्या उंचीवरून त्याला चिडवल्यामुळे तो खूप रडताना दिसतोय. त्यानंतर क्वेडनला विविध स्तरातून पाठिंबा मिळू लागला.

ऑस्ट्रेलियातल्या 9 वर्षांच्या क्वेडन बेयल्स (Quaden Bayles) या मुलावर शाळेत bullying (दमदाटी) झाल्यामुळे त्याच्या मनावर काय परिणाम झाला याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय.

फोटो कॅप्शन,

ऑस्ट्रेलियातल्या क्वेडन बेयल्स या मुलावर शाळेत दमदाटी झाल्यानंतर त्याला जगभरातून पाठिंबा मिळत आहे.

क्वेडन 9 वर्षांचा आहे. मात्र, त्याला Dwarfism आहे म्हणजे तो ठेंगणा असल्यामुळे शाळेतली इतर मुलं त्याला चिडवतात. यावरून त्याच्या शाळेत इतर मुलं त्याचा सतत छळ करतात, त्याला चिडवतात. या सर्व प्रकारामुळे क्वेडन खूप दुःखी आहे.

क्वेडनची आई याराक्का यांनी क्वेडनला शाळेतून आणल्यावर हा व्हीडिओ शूट करून पोस्ट केला आहे. या व्हीडिओत शाळेत मुलांनी त्याच्या उंचीवरून त्याला चिडवल्यामुळे तो खूप रडताना दिसतोय.

याराक्का या व्हीडिओत म्हणतात, "छळवणूक कशाला म्हणतात, तर याला." आपल्याला जगायचं नाही, असंही हा चिमुकला म्हणत असल्याचं या व्हिडियोत दिसतं.

क्वेडनला जगभरातून पाठिंबा

हा व्हीडिओ तब्बल 1 कोटी 40 लाख वेळा पाहण्यात आला आहे. त्यानंतर जगभरातून क्वेडनला समर्थन मिळतंय. #WeStandWithQuaden हा हॅशटॅगही सुरू झाला आहे.

हग जॅकमनसारखे सिनेस्टार, बास्केटबॉलपटू एनेज कॅन्टर असे दिग्गजही क्वेडनच्या बाजूने उभे राहिले आहेत. इतर देशातल्या पालकांनीही क्वेडनला पाठिंबा देणारे आपल्या मुलांचे व्हीडिओ शेअर केले आहेत.

जॅकमन म्हणतो, "तुला वाटतं त्यापेक्षा तू जास्त कणखर आहे, मित्रा." इतरांनीही चांगलं वागावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

मंगळवारी पोस्ट करण्यात आलेल्या या सहा मिनिटांच्या व्हीडिओत क्वेडनची आई आपल्या मुलाला रोज सहन कराव्या लागणाऱ्या मानसिक त्रासाविषयी सांगते. त्या म्हणतात, "मी आत्ताच माझ्या मुलाला शाळेतून आणलं आहे. त्याला मुलं चिडवत होती, मी प्रिन्सिपलला फोन केला. मला लोकांना सांगायचं आहे, पालकांना, शिक्षकांना सांगायचं आहे की एखाद्याचा छळ करण्याचा परिणाम हा असा असतो."

"रोज काहीतरी घडतं. रोज नवा प्रसंग, नव्याने चिडवणं, टोमणे, शिविगाळ."

"तुम्ही तुमची मुलं, तुमचं कुटुंब, तुमच्या मित्रांना सभ्यपणा शिकवाल का?"

क्वेडनला मिळालेला पाठिंबा

शुक्रवारी #StopBullying हा हॅशटॅग ट्रेन्ड होत होता. अनेकांनी आपले अनुभव सांगितले आणि क्वेडनला मजबूत राहण्याचा सल्ला दिला.

इतर देशातल्या मुलांनीही मैत्रीचे मेसेज पाठवले.

अमेरिकेतले कॉमेडियन ब्राड विलियम्स यांनाही एकप्रकारचा बुटकेपणा आहे. त्यांनीही क्वेडनचा व्हीडिओ बघितला आणि क्वेडन आणि त्याच्या कुटुंबाला डिझनीलँडची सहल घडवण्यासाठी एका दिवसाच्या आत 1 लाख 30 हजार डॉलर्स उभे केल्याचं सांगितलं.

क्वेडनसाठी फंड उभारण्यासाठी त्यांनी एक पेज बनवलं आहे. त्यावर ते लिहितात, "हे केवळ क्वेडनसाठी नाही. हे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला आयुष्यात अशाप्रकारचा त्रास सहन करावा लागला, त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला त्याच्या आयुष्यात हे सांगण्यात आलं की तू चांगला नाहीस. तुझ्यात खोट आहे."

आतापर्यंत क्वेडनसाठी 2 कोटी 10 लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे.

"चला, क्वेडेन आणि इतरांनाही दाखवू या की जग चांगलं आहे आणि त्यांच्यासाठीसुद्धा आहे."

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे चिरंजीव इरिक ट्रंप यांनीही हा व्हिडियो बघितला आणि व्हिडियो बघून आपल्याला अत्यंत दुःख झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बास्केटबॉल स्टार एनेस कॅन्टरने ट्वीट करत 'जग तुझ्या पाठिशी आहे', म्हटलं आहे आणि क्वेडन आणि त्याच्या कुटुंबाला NBA स्पर्धा बघण्यासाठी निमंत्रणही दिलं आहे.

ऑस्ट्रेलियामधल्या वेगवेगळ्या स्पोर्ट्स टीम्सनेही क्वेडनला पाठिंबा दिला आहे. एका स्थानिक रग्बी संघाने क्वेडनला या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या स्पर्धेत मैदानापर्यंत संघाचं नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)